Cotton Market Price : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश हे तीन विभाग कापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे कापूस या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र, यंदाचा हंगाम कापूस उत्पादकांसाठी विशेष कष्टदायी राहिला आहे. गेल्या हंगामातही अशीच स्थिती होती. गत दोन हंगामापासून शेतकऱ्यांना या पिकातून चांगले उत्पन्न मिळत नाहीये. याचे कारण म्हणजे बाजारात सध्या कापसाला अपेक्षित असा दर मिळतं नाहीये.
एकीकडे उत्पादनात थोडीशी घट झालेली आहे तर दुसरीकडे बाजारभाव देखील दबावात आहेत. हंगामाच्या सुरुवातीला कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळत होता. मात्र जसा-जसा हंगाम पुढे गेला तसे-तसे भाव कमी होत गेलेत. मध्यंतरी कापसाला हमीभाव पेक्षा कमी दर मिळाला.
यानंतर मात्र कापसाचे भाव वाढले होते. सरासरी भाव पातळी 7500 ते 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली होती. गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा एकदा बाजारात दबाव पाहायला मिळत होता. पण आता गेल्या दोन आठवड्यापासून बाजारभावात दबाव पाहायला मिळाल्यानंतर बाजारात थोडीशी तेजी आली आहे.
देशभरातील अनेक बाजारांमध्ये पांढर सोन पुन्हा एकदा कडाडल आहे. देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाच्या भावात क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांची सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. तथापि, एप्रिल आणि मे महिन्यात कापसाला काय भाव मिळणार हा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाचे भाव तेजीत राहणार का ? पुढील काळात याहीपेक्षा अधिकचा भाव मिळणार का असे प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान याच संदर्भात तज्ञ लोकांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल अर्थातच 27 मार्च 2024 ला सरासरी भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान नमूद करण्यात आली होती. काही बाजारांमध्ये कमाल भाव ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होता. तर किमान भाव काल ७ हजारांपासून सुरु होत होते.
कापसाचे भाव गाव, बाजार समित्या आणि जिनिंगच्या पातळीवर तसेच कापसाच्या गुणवत्तेनुसार कमी जास्त असतात. परंतु सरासरी भाव पातळी ही सात हजार तीनशे ते सात हजार 750 दरम्यान होती.विशेष म्हणजे तज्ञ लोकांनी भारतातील कापसाची आवक पुढील काळातही कमी होत जाणार असे महत्वाचे निरीक्षण यावेळी नोंदवले आहे.
साहजिकच आवक कमी राहणार म्हणजे भाव वाढणार. कमी आवकेचा आधार कापूस भावाला मिळन्याची शक्यता आहे. तसेच निर्यातीसाठीही चांगली मागणी मागणी असल्याचे बोलले जात आहे. याचा सुद्धा बाजार भाव वाढीसाठी सकारात्मक आधार मिळणार आहे. हेच कारण आहे कि, कापसाचे भाव पुढील महिन्यात पुन्हा वाढतील असे चित्र आहे.
बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात भाव पुन्हा सुधारणार आणि मे महिन्यात भाव सध्याच्या पातळीवरून ५ ते ७ टक्के वाढणार आहेत. तथापि, शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन आपल्या मालाची विक्री करणे आवश्यक आहे.