Cotton Market Price : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. या पिकाची शेती राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते.
खानदेशातील जळगाव जिल्हा तर कापसाचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा मात्र खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात उत्पादित झालेल्या कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कापसाचे भाव केव्हा वाढणार हाच सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
या हंगामात केंद्र शासनाच्या माध्यमातून कापसाला 6620 ते 7020 एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे लॉंग स्टेपल कापसाला सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल आणि मध्यम स्टेपलं कापसाला 6620 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव देण्यात आला आहे.
सध्या स्थितीला मात्र राज्यातील अनेक बाजारांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. काही ठिकाणी हमीभावाच्या आसपास बाजार भाव नमूद केला जात आहे. एक तर मान्सून काळात यावर्षी चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.
अशातच आता उत्पादित झालेल्या मालाला देखील चांगला भाव मिळत नसल्याचे विदारक दृश्य आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. अशातच मात्र एक दिलासादायी चित्र समोर येत आहे.
कापसाचे बाजार भाव महाराष्ट्रातील जवळपास सर्वच बाजार समितीमध्ये दबावत आहेत. मात्र राज्यातील एका बाजारात कापसाला समाधानकारक भाव मिळत आहे. काल देखील या बाजारात कापसाला चांगला दर मिळाला होता.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अकोला बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल झालेल्या लिलावात कापसाला कमाल 7400 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.
निश्चितच हा देखील भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही, पण इतर बाजार समितीच्या दराशी तुलना केली असता हे दर किंचित समाधानकारक असल्याचे बोलले जात आहे.
या एपीएमसीमध्ये काल कापसाला किमान 6999, कमाल 7400 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 7199 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.