Cotton Market Price : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. खरं पाहता, गतवर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळाला असल्याने यंदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र यंदा मुहूर्ताचा कालावधी वगळता कापूस दर दबावात आहेत. सध्या बाजारपेठेत कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर नमूद केला जात आहे.
काही बाजारात यापेक्षा अधिक तर काही बाजारात याहीपेक्षा कमी दर मिळत आहे. दरम्यान आता कापूस उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. बाजार अभ्यास करणे भविष्यात कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
तज्ञ लोकांच्या मते, सरकीच्या दरात तेजी असल्याने कापूस दरात मोठी वाढ होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कापसाचे दर एकूण दोन घटकांवर आधारित असतात. रुई आणि सरकीवर हे दर ठरतात. यामध्ये सरकीचे दर हे दोन घटकावर किंवा त्यापासून तयार होणाऱ्या दोन बायप्रॉडक्टवर अवलंबून असतात.
सरकीपासून सरकी पेंड आणि सरकी तेल तयार होते. या दोघा बायप्रॉडक्टलां मिळणाऱ्या दरावर सरकीचे दर अवलंबून असतात. हाती आलेल्या माहितीनुसार, बाजारात सरकी ढेपेला म्हणजे सरकी पेंडलां २ हजार ८०० ते ३ हजार रुपयांपर्यंतचे दर मिळत आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात मका आणि सोयापेंडचे बाजारभाव पोल्ट्री उद्योगासाठी काहीसे भारी आहेत. परिणामी बाजारात कापसाच्या सरकी पेंड ची मागणी आहे. पशुखाद्य उद्योगात मागणी पाहता सरकी पेंड चे दर तेजीतचं राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान सरकी तेलाचेही दर सध्या बाजारात तेजीत पाहायला मिळत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या सरकी तेलाचा भाव हा तीन हजार रुपयाच्या आसपास पाहायाला मिळत आहे. खरं पाहता ऑक्टोबर महिन्यात सरकी तेलाचा भाव २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचं होता. म्हणजे यामध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत सुधारणा झाली आहे.
निश्चितच सरकी पेंड आणि सरकी तेलाच्या दरात तेजी आहे. जे की सरकीच्या दरात तेजी आणत आहे. सध्या देशातील बाजारात सरकीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ४०० ते ४ हजार रुपये दर सरकीला मिळत आहे. विशेष म्हणजे भविष्यात देखील ही तेजी कायम राहणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
निश्चितच यामुळे कापूस दरात वाढ होण्यासाठी पूरक परिस्थिती तयार झाली आहे. सध्या साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर कापसाला मिळत असून यामध्ये वाढ झाली तर कापूस उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.