Cotton Market Price : शेतकऱ्यांमागची संकटांची मालिका गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
या नैसर्गिक आपत्ती पासून शेतकरी बांधवांनी कसेबसे आपले पीक जोपासले, लाखोंचा खर्च केला आणि उत्पादन आपल्या पदरात पाडले आहे. मात्र आता शेतीमालाला बाजारात अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. सोयाबीन, कांदा तसेच कापूस या तिन्ही पिकाला बाजारात अतिशय नगण्य दर मिळत आहे. कापसाला देखील सध्या कमी दर मिळतोय.
गेल्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाला असल्याने यावर्षी शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्याची आशा होती. मात्र तूर्तास तरी शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली आहे. सध्या बाजारात कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत आहे. दरम्यान आज देखील कापूस दर दबावात आहेत. अशा परिस्थितीत आज झालेल्या लिलावाची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2700 क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8700 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8750 नमूद झाला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज १२७ क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावा ते एपीएमसी मध्ये कापसाला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8700 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ८५५० नमूद झाला आहे.
मनवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 800 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आजच झालेल्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये कापसाला 8800 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9195 रुपये प्रतिक क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9,075 रुपये नमूद झाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 300 क्विंटल लोकल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8880 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9100 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9,025 रुपये नमूद झाला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 40 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आजच झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8400 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8700 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8600 रुपये नमूद झाला आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 240 क्विंटल मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8850 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8950 रुपये प्रति करून ठेवले एवढा कमाल तर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8900 नमूद झाला आहे.