Cotton Market News : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक असून यावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. गत हंगामात कापसाला 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला होता.
अशा परिस्थितीत यावर्षी कापूस लागवड वाढल्याचे बोलले जात आहे. मात्र यंदा गेल्या हंगामाप्रमाणे विक्रमी दर मिळाला नाही. यंदा कापूस दर 9500 रुपये प्रति क्विंटल एवढ्या विक्रमी दरात केवळ एक ते दोन महिने विक्री झाला आहे. पण सध्या स्थितीला कापसाला मात्र 8000 चा दर मिळत आहे.
अशा परिस्थितीत पुन्हा एकदा भाव वाढ होईल का? गेल्या हंगामात ज्या पद्धतीने कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता तेवढा दर मिळेल का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. आज आपण तज्ञ लोकांकडून शेतकऱ्यांच्या या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच अमेरिकेच्या कृषी विभागाने कापसाच्या उत्पादनाबाबत आपला सुधारित अहवाल जारी केला आहे तो सुधारित अहवाल देखील जाणून घेणार आहोत.
अमेरिकेच्या कृषी विभागाचा कापूस उत्पादनाबाबतचा अहवाल जारी झाला असून या अहवालात जागतिक कापूस उत्पादनातं कमी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र उत्पादनात घट होत असली तरीदेखील वापरही कमी होणार असं या अहवालात म्हटलं गेलं आहे. कापसाचे जे प्रमुख ग्राहक देश आहेत जसे की चीन पाकिस्तान बांगलादेश आणि टर्की या देशांमध्ये कापूस आयात कमी होणार असल्याचे देखील या अहवालात सांगितलं गेलं आहे.
मात्र या अहवालात कापूस दर टिकून राहणार असल्याचे सांगितले गेले आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या हंगामात 1463 लाख कापूस गाठी उत्पादन होणार आहे. म्हणजेच गेल्या हंगामाच्या तुलनेत 18 लाख कापूस गाठींचे कमी उत्पादन होणार आहे. सोबतच कापसाच्या वापरातही घट होण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. यंदा 1415 लाख गाठी वापरला जाईल असे यात नमूद करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 86 लाख कापूस गाठी कमी वापर या हंगामात होण्याचा अंदाज आहे.
चीन बांगलादेश टर्की पाकिस्तान यांसारख्या देशात मात्र कापसाची आयात कमी होणार आहे. मात्र असे असले तरी काही जाणकार लोकांनी ऊस दरवाढीसाठी पोषक परिस्थितीच असल्याचा दावा केला आहे. जाणकार लोकांच्या मते भारतातून आता मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कापसाची निर्यात सुरू झाली आहे. तसेच उद्योगांकडून कापसाची मागणी कायम राहू शकते. यामुळे कापूस दर वाढीसाठी पोषक परिस्थिती आहे मात्र कापूस गेल्या हंगामाप्रमाणे विक्रमी भावात विक्री होणार नाही.
या हंगामात कापूस 8500 ते 9000 दरम्यान विक्री होऊ शकतो असा अंदाज यावेळी जाणकारांनी वर्तवला आहे. एकंदरीत, शेतकरी बांधवांची जी आशा होती कापूस 12 ते 13 हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान यंदाच्या हंगामातही विकला जाईल ती आशा मावळली आहे मात्र कापूस 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या दरात विक्री होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.