Cotton Market : कापूस हे भारतात उत्पादित होणारं एक मुख्य नगदी पीक. या पिकाची महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटक आणि गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरम्यान गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला असल्याने या राज्यात यंदा कापूस लागवड वाढली. मात्र, सुरुवातीचा काही कालावधी वगळला तर कापसाला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याने यंदा कापूस विक्री या राज्यात आतापर्यंत फारच कमी झाली आहे.
अजूनही शेतकरी बांधव भाव वाढीचे आशेने कापसाची विक्री करत नसल्याचे चित्र आहे. राज्यात देखील कापसाची आवक नगण्यचं आहे.गेल्या काही दिवसांपासून मात्र आवक थोडी वाढली आहे. दरात मोठी घसरण झाली असतानाही आवक वाढली आहे. जानकार लोकांच्या मते अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पैशांची निकड असल्याने आता असे गरीब शेतकरी हळूहळू कापूस विक्री करत आहेत.
यामुळे कापूस दरात अजूनच घसरण झाली. परंतु जे काही सदन शेतकरी आहेत ते अजूनही भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत सध्या आवक वाढली असली तरी मार्च महिन्यात आवक कमी होईल. भाव वाढीच्या आशेने मोठे शेतकरी कापसाची साठवणूक करतील परिणामी दरवाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकरी भाव वाढतील या आशेने मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवत आहेत. पण गुजरात बाबत येथे दोन मत व्यक्त केले जात आहेत.
काही जाणकार लोक गुजरातमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले असल्याने आवक कमी असल्याचे सांगत आहेत. एका आकडेवारीनुसार यंदाच्या हंगामात 1 ऑक्टोबर ते 6 फेब्रुवारी या दरम्यान देशांतर्गत 125 लाख कापूस गाठी विक्रीसाठी बाजारात आला. गेल्या हंगामाशी याची तुलना केली असता 30 टक्के कापूस बाजारात कमी आला. गेल्या वर्षी एक ऑक्टोबर ते 6 फेब्रुवारी दरम्यान 190 लाख कापूस गाठी विक्रीसाठी बाजारात आला होता.
निश्चितच मोठ्या प्रमाणात आवक यंदा कमी आहे. याच प्रमुख कारण दरात झालेली घसरण हेच आहे. गेल्या हंगामात या कालावधीमध्ये दहा हजाराच्या पुढे कापसाला भाव मिळत होता परंतु सध्या स्थितीला कापूस दर 7800 ते 8300 इतका नमूद केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात कापूस दरातील नरमाई अजूनच वाढली. आपल्या महाराष्ट्रात सह इतर काही प्रमुख राज्यात कापसाची आवक वाढल्याने दरातील नरमाई वाढल्याचे सांगितले जात आहे.
या हंगामाच्या सुरुवातीला 90,000 कापूस गाठी रोज विक्रीसाठी येत होती. आता यामध्ये मोठी वाढ झाली असून एक लाख कापूस गाठी पेक्षा अधिक कापूस रोज विक्री होत आहे. विशेष बाब म्हणजे या महिन्याच्या शेवटी दोन लाख कापूस गाठी रोज विक्री होण्याचा अंदाज बांधला जात आहे. खरं पाहता कापूस उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक तंगी मुळे मार्च महिन्यापर्यंत कापसाचे मोठ्या प्रमाणात विक्री करतात. परिणामी मार्चपर्यंत कापूस दर दबावात असतात.
शेतकऱ्यांनी बाजारातील या समीकरणाचा अभ्यास करून तूर्तास कापूस विक्री करण्याऐवजी साठवणूक करण्यावर भर दिला आहे. म्हणजेच आता शेतकरी बांधव मार्च नंतर कापूस विक्रीसाठी पुढे सरसावणार आहेत. मार्च नंतर प्रामुख्याने बाजार भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीचे नियोजन मार्चनंतर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मार्च महिन्यानंतर खरच भाव वाढ होईल का हेच पाहण्यासारखं राहणार आहे.
एवढेच नाही तर जे सधन शेतकरी आहेत ते मार्चनंतर नाही तर जून नंतर कापूस विक्री करू शकतात असे देखील बोलले जात आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी भारतीय कापूस बाजारात मंदी आली असल्याने बांगलादेश सहित इतर काही देशांनी भारताकडून कापूस खरेदी वाढवली असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर भारतीय कापूस बाजारात अजून मंदी आली तर चीन देखील भारताकडून कापूस मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतो असं देखील व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान काही जाणकार लोकांनी दरवाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज बांधला आहे. जाणकार लोकांच्या मते, चायना जो की कापसाचा प्रमुख खरेदीदार देश आहे त्याने अमेरिकेकडून कापसाची खरेदी वाढवली आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात कापूस तेजीत पाहायला मिळत आहे. यामुळे देशांतर्गत कापूस दर देखील अधिक काळ दबावत राहणार नसल्याचा अंदाज आहे.
बाजारात सध्या आवकेचा दबाव आहे. मात्र मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने आवक वाढली आहे. यामुळे ही आवक जास्त काळ राहणार नाही आणि आवकेचा दबाव निश्चितच कमी होईल. तसेच जर अशा परिस्थितीत निर्यात वाढली तर कापूस दर अजूनच वाढतील. या हंगामात मात्र कापसाला 8500 ते 9500 दरम्यान दर मिळू शकतो असा अंदाज तज्ञ अजूनही वर्तवत आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी विक्रीचे नियोजन करताना एकदाच संपूर्ण विक्री करू नये आणि संपूर्ण कापूस पण साठवणूक करून ठेवू नये अस देखील बोललं जात आहे. एकंदरीत शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी असे सांगितले जात आहे.