Cotton Grower Farmer : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला होता. मात्र असे असले तरीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या शर्तीने आणि अधिकचा खर्च करून कापसाचे पीक घेतले. पण अपेक्षित असे उत्पादन मिळू शकलं नाही. उत्पादनात घट झाली पण गेल्या वर्षी प्रमाणे दर मिळाला तर उत्पादनातील घट भरून निघेल अशी शेतकऱ्यांची आशा होती.
मात्र मुहूर्ताचा काही कालावधी वगळला तर यावर्षी संपूर्ण हंगामभर कापसाचे दर दबावातचं आहेत. यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला आहे. जळगाव जिल्ह्यात जवळपास 65 टक्के शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या आशेने आपल्या घरातच कापसाची साठवणूक केली आहे. मात्र आता घरात कापूस साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांपुढे एक वेगळे संकट उभे झाले आहे.
खरं पाहता ज्या शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवणूक केली आहे अशा कापसामध्ये वेगवेगळे कीटक तयार झाले आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून एकाच ठिकाणी कापूस साठवणूक करून पडून असल्याने हे कीटक तयार झाले आहेत. दरम्यान या कीटकांच्या चाव्यामुळे शेतकरी कुटुंबातील लहान मुले व इतर सदस्यांच्या अंगाला खाज सुटत आहे. ज्या शेतकरी कुटुंबाने कापसाचे साठवणूक केली आहे अशा कुटुंबात खाजऱ्याचे प्रमाण वाढत असून शेतकऱ्यांच्या पुढ्यात या नवीन संकटामुळे मोठं आव्हान उभ झालं आहे.
एकीकडे बाजारात साडे सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरात कापूस विक्री करावा लागत असल्याने कापसाची साठवणूक करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला असून आता साठवणूक केलेल्या कापसात कीटक तयार झाले असल्याने आणि याचा आरोग्यावर अपायकारक परिणाम होत असल्याने आता शेतकरी बांधव दुहेरी कोंडीत सापडला आहे. दरम्यान आता ज्या शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवला होता त्यांनी विक्री सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी घरातील कापूस गोठ्यात साठवला आहे.
तर काही शेतकरी बांधव एवढ्या थंडीतही घरात कापूस असल्याने बाहेर झोपत आहेत. साठवलेल्या कापसामध्ये प्रामुख्याने गुलाबी बोंड अळी या कीटकांचा प्रादुर्भाव होतो, बोंड अळीचा मात्र मानवी आरोग्यावर फारसा असा परिणाम होत नाही. मात्र दोन ते तीन महिने कापूस साठवून ठेवला तर डस्टी कॉटनबर्ग नावाचा कीटक देखील तयार होतो. या कीटकाच्या चाव्यामुळे अंगावर पुरळ उठतात आणि खाज सुटते.
विशेषता लोकांना अलर्जी असते अशांना याचा जास्त त्रास होतो. वारंवार या कीटकांच्या संपर्कात आल्यास हा त्रास वाढतच राहतो. दरम्यान, डॉक्टर लोकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, या कीटकांपासून जी काही खाज सुटते त्यावर औषध उपचार आहे. मात्र तरी देखील कीटकांचा त्रास वाढला की कापसापासून दूर झोपावे. अंगावर पुरळ उठल्यास कीटकांच्या संपर्कात आल्याने हा त्रास अजूनच वाढू शकतो.
त्यामुळे साठवलेल्या कापसापासून दूर झोपणे अत्यावश्यक आहे. दरम्यान कापूस उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी देखील समोर येत आहे. जाणकार लोकांनी कापसाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान कापूस दरात किती वाढ होईल आणि दरवाढीचे कारणे काय राहतील हे सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अधिक माहिती जाणून घ्या.