Cotton Farming : तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड केली आहे का ? अहो, मग तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायद्याचा ठरणार आहे. कारण की, आज आपण कापसावरील मावा, पांढरी माशी आणि तुडतुडे किडींच्या नियंत्रणाबाबत माहिती पाहणार आहोत. कपाशी पिका बाबत बोलायचं झालं तर हे महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारे नगदी पीक म्हणून ओळखले जाते.
नाशिक, अहमदनगर समवेतच पश्चिम महाराष्ट्रात देखील कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये फारच कमी पाऊस झाला होता, 2023 चा मान्सून सुरू होण्याआधीच हवामान खात्याने यावर्षी कमी पाऊस राहणार असे स्पष्ट केले होते.
मात्र असे असतानाही गेल्या वर्षी कापसाची लागवड मोठी विक्रमी होती. यंदा तर मान्सून काळात चांगल्या समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत किंचित वाढेल असेच बोलले जात आहे.
दरम्यान आज आपण कापूस पिकात पहिली फवारणी कोणत्या औषधांची करावी? कापूस पीक प्राथमिक अवस्थेत असताना या पिकावर मावा, पांढरी माशी आणि तुडतुडे कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो यामुळे या कीटकांच्या नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकांचा पहिल्या फवारणीत समावेश केला पाहिजे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कपाशी पिकात पहिली फवारणी कधी करावी?
कपाशी पीक उगवणीनंतर पंधरा दिवसांनी पहिली फवारणी केली गेली पाहिजे. उगवणीनंतर पंधरा दिवसांपासून ते 25 दिवसांच्या कालावधीत कापसाच्या पिकात पहिली फवारणी केल्यास चांगले परिणाम पाहायला मिळतात.
कपाशी पिकात अर्ली स्टेजमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी या कीटकांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे याच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी खूपच आवश्यक असते.
मात्र या कीटकांच्या नियंत्रणासाठी आणि पिकाची चांगली जोमदार वाढ व्हावी यासाठी आवश्यक असणारी पहिली फवारणी जास्त खर्चिक नसावी याचीही काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
पहिल्या फवारणीसाठी कोणत्या औषधांचा वापर करावा
- शेतकरी बांधवांनी Imidacloprid 17. 8% घटक असणारे कीटकनाशक (प्रमाण 10ml) + 19-19-19 (100gm) या औषधांची फवारणी केली पाहिजे.
- Thimathoxam 25% (प्रमाण 10ml) घटक असणारे कीटकनाशक + 19-19-19 (100gm) या विद्राव्य खताची फवारणी केली पाहिजे.