Cotton Farming : कापूस पिकासाठी दुसरी फवारणी कोणत्या औषधांची आणि केव्हा केली पाहिजे असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? अहो मग चिंता करू नका आजचा हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. आज आपण कापूस पिकाच्या दुसऱ्या फवारणीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कापसाबाबत बोलायचं झालं तर हे पीक महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या तीन विभागांमध्ये सर्वात जास्त उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याशिवाय या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते.
खरंतर राज्यातील अनेक भागांमधील शेतकऱ्यांच्या कापूस लागवडीला एका महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसासाठी दुसरी फवारणी कोणती असावी या संदर्भात विचारणा केली जात आहे.
कापूस पिकासाठी दुसरी फवारणी कधी केली पाहिजे?
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, कापूस पिकात कापूस लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी दुसरी फवारणी केली पाहिजे. या काळात कापूस पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे अशा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
यामुळे या काळात या कीटकांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. दुसरीकडे या काळात ढगाळ वातावरण आणि जास्तीचा पाऊस राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
यामुळे या बुरशीजन्य रोगांवर देखील नियंत्रण मिळवणे जरुरीचे असते. हा काळ पीक वाढीसाठी देखील खूपच अनुकूल आणि महत्त्वाचा असतो. या स्टेजमध्ये फुटव्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.
यामुळे कापूस पिकात दुसरी फवारणी घेताना एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक टॉनिक किंवा विद्राव्य खत वापरले पाहिजे. या औषधांचे कॉम्बिनेशन कापूस पिकासाठी मोठे फायदेशीर ठरते.
कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे ?
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या दुसऱ्या फवारणीत यूपीएल कंपनीचे उलाला किंवा यूपीएल कंपनीचे लॅन्सरगोल्ड यापैकी कोणतेही एक कीटकनाशक वापरले पाहिजे. जर उलाला हे कीटकनाशक वापरणार असाल तर परती 15 लिटर पंपासाठी आठ ग्रॅम आणि जर लॅन्सर गोल्ड हे कीटकनाशक वापरणार असाल तर प्रति 15 लिटर पंपांसाठी 25 ग्रॅम असे प्रमाण असणे आवश्यक आहे.
बुरशीनाशकाबाबत बोलायचं झालं तर यूपीएल कंपनीचे साफ SAAF हे बुरशीनाशक 15 लिटर पंपासाठी 30 ग्रॅम या प्रमाणात घेतले जाऊ शकते. तसेच फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्राव्य खतांऐवजी टॉनिकचा वापर करावा असा सल्ला काही कृषी तज्ञांनी दिला आहे.
टॉनिक म्हणून बायोविटाएक्स प्रति 15 लिटर पंपासाठी 30 मिली या प्रमाणात घेतले जाऊ शकते. पण जर शेतकऱ्यांना विद्राव्य खतच द्यायचे असेल तर शेतकरी बांधव 12 : 61 : 00 हे विद्राव्य खत 15 लिटर पंपासाठी 75 ग्रॅम या प्रमाणात घेऊ शकतात.