Cotton Farming : शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. मे महिन्याला सुरुवात झाली असून मान्सूनची आतुरता लागली आहे. राज्यातील काही भागांमध्ये विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये दुसऱ्या राज्यातून कापूस बियाणे मागवून शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी सुरू केली आहे. पण, जोपर्यंत मान्सूनचा पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत कापसाची पेरणी करू नये असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.
याचे कारण म्हणजे मानसून पूर्व कपाशी लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हेच कारण आहे की मान्सूनपूर्व कपाशी लागवड टाळावी असा सल्ला जाणकारांनी दिला आहे. यामुळे आपल्या महाराष्ट्रात एक जून नंतरच कापसाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होतात.
याआधी राज्यात बियाणे उपलब्ध होत नाही. दरम्यान यावर्षी राज्यात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून नुकताच वर्तवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे काही हवामान अभ्यासाकांनी यावर्षी मान्सून लवकरच भारताच्या मुख्य भूमीत दाखल होऊ शकतो असा अंदाज दिला आहे. यंदा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवली जात असल्याने कापसाची लागवड वाढू शकते असा अंदाज आहे.
तथापि जर कपाशी पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक राहणार आहे. दरम्यान आज आपण हलक्या व मध्यम जमिनीत आणि कोरडवाहू भागात लागवडीसाठी योग्य असलेल्या कापसाच्या 11 जातींची माहिती पाहणार आहोत.
हलक्या व मध्यम कोरडवाहू जमिनीसाठी उत्कृष्ट कापसाच्या 11 जाती
राशी सीड्स कंपनीचे राशी 776
राशी सीड्स कंपनीचे राशी 605
राशी सीड्स कंपनीचे राशी 650
कावेरी सीड्स कंपनीचे एटीएम
कावेरी सीड्स कंपनीचे जादू
कावेरी सीड्स कंपनीचे जॅकपॉट
अजित सीड्स कंपनीचे अजित 155
Nuziveedu सीड्स कंपनीचे मल्लिका
Nuziveedu सीड्स कंपनीचे राजा
Nuziveedu सीड्स कंपनीचे मालिनी
Nuziveedu सीड्स कंपनीचे भक्ती
Nuziveedu सीड्स कंपनीचे उत्तम
Nuziveedu सीड्स कंपनीचे बलवान
वर नमूद केलेल्या या सर्व जाती हलक्या, मध्यम व कोरडवाहू भागातील जमिनीसाठी फायदेशीर असल्याचा दावा कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केला आहे. विशेष म्हणजे या जाती एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवून देऊ शकतात असे म्हटले जात आहे. एवढेच नाही जर योग्य पद्धतीने नियोजन केले पाऊसमान चांगला राहिला, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही तर या जातीपासून एकरी 22 क्विंटल पर्यंत देखील उत्पादन मिळवता येत नाही शक्य असल्याचा दावा केला जात आहे.
तथापि कापसाचे उत्पादन हे वेगवेगळ्या घटकांवर आधारित असते. जमिनीचा मगदूर, स्थानिक हवामान, पाण्याचे आणि खतांचे योग्य नियोजन या सर्व बाबींवर कापूस उत्पादन अवलंबून राहणार आहे. यामुळे तुम्ही तुमच्या स्थानिक हवामानानुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा सल्ला घेऊन कापसाचे वाण निवडावे.