Cotton Farming : खरीप हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. खरिपात यंदाही कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. खरे तर गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता तरी देखील कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. यंदा मात्र हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली असून यामुळे यावर्षी कापूस लागवड वाढणार असे बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण कापसाच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना ज्या कापसाच्या जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले आहे त्याच कापूस वाणाची आज आपण माहिती पाहणार आहोत.
Nuziveedu सीड्स कंपनीचे आशा बी टी 2 : गेल्या वर्षी कापसाच्या या जातीपासून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन मिळवले आहे. दुष्काळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांनी 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवले आहे. अशा परिस्थितीत जर मान्सून सामान्य राहिला तर या जातीपासून 21 ते 22 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते सदावा केला जात आहे.
या जातीचे बोंड टपोर असतं आणि कापसाला वजन चांगलं मिळतं. 27 ते 29 एम एम धागा असतो. म्हणजेच ही एक मिडीयम स्टेपल कापसाची जात आहे. बागायती भागासाठी हा वाण योग्य असल्याचे आढळून आले आहे.
मोक्ष KCH 15K 39 BG 2 : कापसाच्या या जातीपासून देखील गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन मिळवले आहे. या जातीपासून ड्रीप इरिगेशन करून गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी 19 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवले आहे.
मे च्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केली तरी यातून चांगले उत्पादन मिळते. या जातीच्या कापसाचा धागा हा 25 ते 29 एमएम एवढा म्हणजेच मध्यमच स्टेपलं आहे. या जातीवर रसशोषक किडीचा आणि रोगांचा फारसा प्रादुर्भाव पाहायला मिळत नाही.
तुळसी कंपनीचे कबड्डी : जे शेतकरी कापसाची लागवड करतात त्यांना या जातीची माहिती असेलच. हा वाण संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय या जातीची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा आणि विदर्भ येथील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये या जातीच्या कापसाची लागवड पाहायला मिळते.
तथापि उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात या जातीच्या कापसाची फारशी लागवड पाहायला मिळत नाही. या जातीबाबत बोलायचं झालं तर कीड, रोगास कमी बळी पडते. जास्त पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी सारखी परिस्थिती तयार झाली तरी चांगले उत्पादन मिळते आणि कमी पाऊस पडला तरी देखील यातून चांगले उत्पादन मिळते.
यु एस ॲग्री सीड्स कंपनीचे यु एस 7067 : या जातीपासून देखील 12 ते 17 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. शेतकऱ्यांमध्ये ही जात बऱ्यापैकी लोकप्रिय असून बागायती आणि जिरायती अशा दोन्ही परिस्थितींमध्ये या जातीचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
ऍग्रो स्टार कंपनीचे शिवांश : या जातीची देखील राज्यातील काही शेतकरी बांधव लागवड करतात. मात्र या जातीची बागायती भागात लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. कोरडवाहू भागात याची लागवड करू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. या जातीपासून 18 ते 19 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.