Cotton Farming : राज्यात सध्या सर्वत्र बी-बियाणांसाठी आणि खतांसाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. दिवाळी आणि अक्षय तृतीयेच्या सणाला ज्या पद्धतीने कपड्यांच्या आणि दागदागिन्यांसाठी बाजारात जशी गर्दी असते तशीच गर्दी सध्या बियाणे खरेदीसाठी आणि खत खरेदीसाठी कृषी निविष्ठांच्या दुकानावर पाहायला मिळत आहे.
कृषी निविष्ठांची दुकाने सध्या हाऊसफुल आहेत. मात्र, बी-बियाण्यांच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांची सर्रास लूट सध्या बाजारात पाहायला मिळत आहे. यामध्ये कापूस बियाण्यांच्या विक्रीमध्ये विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. खरं पाहता सध्या बाजारात पंगा आणि कबड्डी या दोन कापूस वाणाची चलती पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा :- हळद लागवड करताय का ? मग हळदीच्या सुधारित जाती कोणत्या ? वाचा….
कापूस उत्पादक शेतकरी या दोन कापूस वाणाना मोठी पसंती दाखवत आहेत. याचा दुकानदार फायदा उचलत आहेत. काही भागात कबड्डी वाणाची 800 रुपयांची बियाण्याची बॅग पंधराशे ते सोळाशे रुपयांना विक्री होत आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने मात्र काही ठिकाणी हा काळाबाजार रोखला आहे. मात्र काही भागात शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच आहे.
अशा परिस्थितीत आज आपण आठशे रुपयांची बियाण्याची बॅग 1500 ते 1600 रुपयांना खरेदी करण्यास शेतकरी का राजी होत आहेत. या वाणाच्या नेमक्या विशेषता काय आहेत. याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- सोयाबीनवर यंदा ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता; आतापासूनच करा ‘हे’ काम, उत्पादनात घट येणार नाही
कापसाच्या कबड्डी आणि पंगा वाणाच्या विशेषता
बाजारात सध्या शेतकऱ्यांमध्ये कापसाचे कबड्डी आणि पंगा या वाणाच्या कापसाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे मध्यम भारी हलक्या जमिनीत हे दोन्ही वाण चांगले फुलते. बागायती आणि कोरडवाहू दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या वाणाची लागवड केली जाते.
या जातीच्या कापूस बोंडाचे वजन हे पाच ते सहा ग्रॅमचे असते. या जातीपासून एकरी आठ ते पंधरा क्विंटल पर्यंतचा उतारा मिळत असल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे.
विशेष बाब अशी की गेल्या हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले मात्र ज्या शेतकऱ्यांनी कबड्डी वाणाची लागवड केली होती त्यांचे नुकसान तुलनेने कमी झाले आहे.
हेच कारण आहे की जास्तीचा पाऊस झाला तरीदेखील चांगले उत्पादन देणाऱ्या या वाणाची बाजारात सध्या मागणी आहे. याचा फायदा मात्र काही दुकानदारांच्या माध्यमातून घेतला जात आहे.
हे पण वाचा :- अखेर कापूस लागवडीचा श्रीगणेशा झाला; ‘या’ आधुनिक पद्धतीने करा कापसाची लागवड, मजुरीत होणार बचत, उत्पादनात होणार मोठी वाढ