Cotton Farming : मान्सूनचे 19 मे ला अंदमानमध्ये आगमन झाले आहे. तेव्हापासून मात्र मान्सूनचा मुक्काम अंदमानमध्येच आहे. भारतीय हवामान विभागाने चार जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज बांधला असून साधारणतः 15 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मानसून आगमनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत मान्सूनची आता चाहूल लागली आहे. चातक पक्षी देखील आता पेरते व्हा, पेरते व्हा म्हणू लागले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्व मशागतीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. यामध्ये जमिनीची नागरणी यापूर्वीच शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून इतर कामे देखील अंतिम टप्प्यात आली आहेत.
आता शेतकरी फक्त पावसाची वाट पाहत आहेत. मान्सून आगमन झाले, जोरदार मान्सूनचा पाऊस झाला की लगेचच शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात होणार आहे. अशातच मात्र राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा सल्ला जारी केला आहे. हा सल्ला कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाचा आहे.
हे पण वाचा :- यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या ‘या’ महाराष्ट्रासाठी शिफारसीत जातीची पेरणी करा, अधिकचे उत्पादन मिळवा
वास्तविक राज्यात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण देखील कापूस या पिकावरच अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. यासाठी वेगवेगळी कारणे कारणीभूत आहेत.
यामध्ये फरदड कपाशीचे उत्पादन, मान्सून पूर्व कापूस लागवड करणे अशा इत्यादी कारणाचा समावेश आहे. यामुळे कृषी विभागाने आता शेतकरी बांधवांना मान्सूनपूर्व कापूस लागवड करू नये असा सल्ला दिला आहे. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून एक जून पूर्वी कापूस बियाणे विक्रीसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे.
जे दुकानदार एक जून पूर्वी कापूस बियाणे विक्री करतील त्यांचे परवाने कायमचे निलंबित केले जातील असा इशारा यावेळी कृषी विभागाने दिला आहे. कापूस उत्पादकांच्या मते मान्सूनपूर्व कापूस लागवड केली की उत्पादनात वाढ होते.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारच्या ‘या’ एका निर्णयामुळे उन्हाळी कांदा दरात होणार मोठी वाढ, वाचा….
म्हणून अधिकच्या उत्पादनासाठी कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व कापूस लागवड केली जाते. परंतु यामुळे उत्पादनात वाढ होते की नाही हा तर विश्लेषणाचा भाग आहे मात्र गुलाबी बोंड आळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हे नक्की.
यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांनी यंदा मान्सूनपूर्व कापूस लागवड करू नये असे आवाहन केले आहे. मान्सूनपूर्व कापूस लागवड केली नाही तर गुलाबी बोंड अळीचे चक्र थांबेल आणि गुलाबी बोंड आळीपासून पीक वाचेल, साहजिकच यामुळे उत्पादनातही वाढ होईल.
जाणकार लोकांच्या मते ज्यावेळी मान्सूनचा चांगला जोरदार पाऊस होईल त्यावेळी कापूस लागवड करणे आवश्यक आहे. त्यापूर्वी केलेली कापूस लागवड मानसूनपूर्व असते आणि यामुळे वेगवेगळे रोग पिकावर येतात.
हे पण वाचा :- नोकरीने मारले पण काळ्या आईने तारले ! शेवगा शेतीतून तरुण शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई, वाचा ही यशोगाथा