Cotton Farming : येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे. हवामान खात्याने नुकतेच यावर्षी मान्सूनचे वेळेआधीच आगमन होणार असे म्हटले आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार यंदा मानसूनचे अंदमानात दोन दिवस आधी आगमन होणार आहे. 19 मे ला यंदा मान्सून अंदमानात पोहोचणार आहे. दरवर्षी अंदमानात मान्सूनचे 21 मे ते 22 मे च्या दरम्यान आगमन होत असते.
यंदा मात्र दोन-तीन दिवस लवकरच मान्सून अंदमानात पोहोचणार आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये एक जूनला आणि आपल्या महाराष्ट्रात 8 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होऊ शकते असे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 16 मे 2024 पासून कापसाचे बियाणे उपलब्ध होणार आहे.
यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असा अंदाज असल्याने कापूस लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढू शकते असे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत, आज आपण कापसाच्या टॉप 10 व्हरायट्या कोणत्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कापसाच्या टॉप दहा व्हरायट्या कोणत्या
नाथ सीड्स कंपनीचे संकेत : नाथ सीड्स कंपनीचे संकेत हे एक उत्तम उत्पादनक्षमता असणारे वाण आहे. राज्यातील हवामान या जातीसाठी पोषक असून यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.
आदित्य सीड्स कंपनीचे मोक्ष : मोक्ष या वाणाची देखील आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीच्या कापसाला लवकर बोंड येतात, बोंडांचा आकार आणि वजन अधिक असते, टपोरे बोंड असतात. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
श्रीकर सीड्स कंपनीचे जय हो : Srikar Seeds कंपनीचे जय हो हे वाण देखील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या जातीपासूनही शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळत आहे.
राशी सीड्स कंपनीचे 659, राशी सीड्स कंपनीचे 773 आणि राशी सीड्स कंपनीचे 779 : राशी सीड्स कंपनीचे हे तिन्ही वाण कोरडवाहू आणि बागायती भागासाठी उत्तम आहेत. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. या जातीची रोगप्रतिकारक्षमता चांगले असून या जातींमध्ये रोगांचे प्रमाण कमी आढळते.
श्रीराम बायो सीड्स कंपनीचे GHH O29, युवा आणि बिंदास : श्रीराम बायो सीड्स कंपनीच्या या तिन्ही जाती देखील उच्च उत्पादनक्षमता असणाऱ्या आहेत. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन तर मिळतेच शिवाय उत्पादन खर्च देखील कमी राहतो.
Mahyco सीड्स कंपनीचे जंगी, धनदेव प्लस आणि बाहुबली : म्हयको सीड्स कंपनीच्या या तिन्ही जाती देखील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय असून यातूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
US ऍग्रो सीड्स कंपनीचे युएस 4753 आणि युएस 7067 : कापूस उत्पादक शेतकरी बांधव यादेखील जातींची लागवड करू शकतात. राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल असून याही जातींपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.