Cotton Farming: मित्रांनो खरं पाहता देशातीलं अनेक भागात मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव (Farmers) खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीपूर्व नियोजन करण्यात सध्या व्यस्त असल्याचे बघायला मिळत आहे.
वास्तविक खरीप हंगामात आपल्याकडे कापसाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आपल्या राज्यात कापसाची लागवड (Cotton Cultivation) विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग कापसाच्या शेती साठी जगात विख्यात आहेत.
कापसाची मागणी संपूर्ण जगात झपाट्याने वाढत असल्याने जगातील महत्त्वाच्या पिकांमध्ये कापसाची गणना होते. भारत जगातील एकूण कापुस उत्पादनात (Cotton Production) कायम अव्वलस्थानी राहिला आहे. आपल्या देशात खरीप हंगामात सर्वाधिक कापूस लागवड केली जातं आहे.
गत वर्षी कापसाला चांगला विक्रमी दर (Cotton Rate) मिळाला असल्याने यावर्षी कापसाची लागवड वाढणार असल्याचा कृषी तज्ञांचा अंदाज आहे. बाजारातील मागणी आणि चांगला भाव यामुळे आपल्या राज्यातील शेतकरी कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. कापूस हे दीर्घ कालावधीचे नगदी पीक असल्याने त्याची लागवड काळ्या जमिनीत केल्यास चांगले उत्पन्न मिळते. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी वेळेवर पोषण व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.
अशा प्रकारे कापूस लागवड करा:- कापूस लागवडीपूर्वी शेत तयार करणे अर्थात शेतीची पूर्वमशागत व्यवस्थितरीत्या करणे आवश्यक आहे. पूर्व मशागत करण्यासाठी शेतजमीनीची खोल नांगरणी करून सपाटीकरणाचे काम करावे लागते. शेतात पेरणी करण्यापूर्वी माती परीक्षण करून जमिनीत आवश्यकतेनुसार खत व पोषक घटकाचा वापर करावा लागेल. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेवटच्या नांगरणीनंतर एक एकर मोकळ्या जागेत एक क्विंटल निंबोळी पेंड किंवा पाच किलो निंबोळी किंवा कडुलिंबाचे तेल मिसळावे. त्यामुळे पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही व निरोगी उत्पादन मिळते.
पेरणीची पद्धत:- भारतात कपाशीची लागवड बागायती आणि जिरायती अशा दोन्ही स्थितीत केली जाते. बागायत नसलेल्या शेतात कपाशीची पेरणी करण्यासाठी बेड 3.5 फूट लांब आणि 1.5 फूट रुंद करावे लागतील. या बेड्समध्ये रोपांचे अंतर 1.5 ते 2 फूट ठेवणे पूर्णपणे योग्य आहे.
दुसरीकडे, बागायती शेतात बेडची लांबी व रुंदी 4-4 फूट ठेवून 3.5 ते 4 फूट अंतरावर बियाणे पेरणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी 4-5 फूट खोल खड्डा खणून त्यात शेण व जिप्सम टाकू शकता. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, एक एकर जमिनीवर कापूस लागवडीसाठी सुमारे दोन पोती जिप्सम आणि 10-15 क्विंटल शेणखत वापरले जाऊ शकते.
पोषण व्यवस्थापन आणि सिंचन कसे करावे:- कापसाची पेरणी मे ते जून या दरम्यान केली जाते. जेणेकरून जुलै महिन्यापर्यंत पावसाच्या माध्यमातून सिंचनाचे व्यवस्थापन करता येईल. कापूस पिकामध्ये माती परीक्षणाच्या आधारे पोषण व्यवस्थापनानुसार खतांचा वापर करावा.
पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एक हेक्टरमध्ये 50-70 किलो नत्र आणि 20-30 किलो स्फुरद वापरणे चांगले असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगत असतात. लक्षात ठेवा नत्राची निम्मी मात्रा पेरणीच्या वेळी आणि उरलेली मात्रा खुरपणी करताना द्यावी लागेल.