Cotton Farming: मित्रांनो भारतात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची शेती केली जाते. आपल्या राज्यात देखील कापसाची लागवड (Cotton Cultivation) मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
राज्यातील शेतकरी बांधव कापूस पिकातून (Cotton crop) चांगली कमाई देखील करीत आहेत. विशेष म्हणजे गत हंगामात कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने या हंगामात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा दावा केला जात आहे.
निश्चितच कापसाची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायद्याची ठरते मात्र पावसाळ्यात पांढरी माशी, थ्रीप्स आणि तुडतुडे किडे तसेच रस शोषणाऱ्या किडींमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान होते. रस शोषक कीटकांच्या प्रतिबंधासाठी, त्यांची ओळख आणि प्रतिबंध योग्य वेळी करणे खूप महत्वाचे आहे.
बंधूंनो, जर तुमच्या लक्षात आले की कापसाच्या झाडाची पाने कुरळे, चमकदार, तेलकट किंवा कडा चिकटलेली आहेत, तर मग तुमच्या कापूस पिकांवर रस शोषक कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे असं समजा. आज आपण आजच्या या लेखात कापसातील शोषक कीटकांवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
- कापसातील रस शोषक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही अनेक पावले उचलू शकता.
- कापूस पिकाचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी वेळेवर पेरणी करावी.
- पाण्याचा ताण पडू नये म्हणून शेताला चांगले पाणी दिले पाहिजे.
- रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, विषाणू संक्रमित झाडे वेळोवेळी शेतातून काढून टाका.
- ज्वारी, नाचणी, मका इ. पांढरी माशी न आवडणाऱ्या यजमान पिकांसह पीक फिरवा.
- वेळोवेळी शेताची तपासणी करा आणि तण काढून टाका.
- कीटकांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांना मारण्यासाठी प्रकाश सापळे आणि फेरोमोन सापळे वापरा.
- एकाच वेळी नायट्रोजनचा पूर्ण डोस देणे टाळा. त्याऐवजी, ते 3-4 भागांमध्ये द्या.
- चेपा (ऍफिड), तुडतुडे आणि थ्रिप्स (चुर्डा) पासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी, इमिडाक्लोप्रिड 70 डब्ल्यूएस @ 7 ग्रॅम/किलो बियाण्याची प्रक्रिया करा.
- कीड व रोग व्यवस्थापनासाठी NSKE प्रति हेक्टर 5% किंवा 3% कडुलिंबाचे तेल 15 लिटर पाण्यात विरघळून किंवा 1500 पीपीएमचे एजाडिरेक्टिन प्रति लिटर पाण्यात 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करा.
- 1500 ते 2000 मिली ट्रायझोफॉस 40 ईसी किंवा 100 ग्रॅम थायोमेथॉक्सम 25% डब्ल्यूजी कीटकनाशक 500 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करा आणि प्रति हेक्टरी या प्रमाणात फवारणी करा.
तुम्हाला रसायनांचा वापर फक्त शेवटचा उपाय म्हणून करावा लागेल. तुम्ही वापरत असलेल्या रसायनाची पुनरावृत्ती करू नका. मित्रांनो कोणत्याही औषधाची फवारणी करण्याअगोदर कृषी तज्ञांचा किंवा कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.