Cotton Farming : मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे गतवर्षी कापसाला सोन्यासारखा बाजार भाव (Cotton Market Price) मिळाला होता. गेल्या वर्षी कापसाला ऐतिहासिक विक्रमी बाजार भाव (Cotton Bajarbhav) मिळाला असल्याने वर्षी कापसाच्या (Cotton Crop) क्षेत्रात उल्लेखनीय वाढ होणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा होता.
झालं देखील अगदी तसंच या वर्षी राज्यात कापसाच्या क्षेत्रात भली मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली शिवाय कापूस पिकासाठी या हंगामात (Kharif Season) पोषक वातावरण निर्माण झाल्याने कापसाच्या उत्पादनात आता भली मोठी वाढ होणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.
मित्रांनो खरे पाहता या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली असल्याने कापूस पिकासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे यावर्षी गत हंगामापेक्षा अधिक कापसाचे उत्पादन (Cotton Production) होणार असल्याचा दावा जाणकार करत आहेत. कापूस व्यवसायातील (Cotton Business) जाणकार लोकांच्या मते, कापसाच्या क्षेत्रात झालेली वाढ लक्षात घेता आणि कापूस पिकासाठी पोषक वातावरण पाहता या वर्षी राज्यातील कापसाच्या उत्पादनात तब्बल 38 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Farmer) ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र अनेक शेतकरी बांधव त्याचे उत्पादन वाढणार असल्याने बाजार भाव खाली येतील असा विचार करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण कापसाच्या दरात (cotton rate) आगामी काळात खरंच घट होईल का कि कापसाचे दर मागील वर्षासारखेच राहतील याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. त्यावेळी पावसामुळे गत हंगामात कापसाच्या उत्पादनात भली मोठी घट झाली होती. एका आकडेवारी नुसार गत हंगामात राज्यात कापसाचे 65 लाख गाठींचे उत्पादन झाले होते. मात्र या हंगामात कापसाचे तब्बल 90 लाख गाठींचे उत्पादन होणार आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 2020 या कालावधीत राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात कायमच घट होत होती.
शिवाय अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेल्या व्यापारी युद्धामुळे कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेहमीच कवडीमोल दर मिळत असे. मात्र गेल्या वर्षी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक विशिष्ट धोरण अंगीकारले. त्याच झालं असं केंद्र सरकारने गतवर्षी सूतगिरण्यांना भलमोठ अनुदान दिलं. यामुळे धूळ खात पडलेल्या सूतगिरण्या पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन उभारी घेऊ लागल्या. त्यामुळे भारतीय सूतगिरण्यामध्ये कापसाची मोठी मागणी वाढली. यामुळे गत वर्षी कापसाला आपल्या देशाआंतर्गत बाजारपेठेत चांगला बाजारभाव मिळाला.
यावर्षी देखील मिळणार कापसाला सोन्यासारखा भाव कारण खालीलप्रमाणे :
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी अमेरिकेतील प्रमुख कापूस उत्पादक भागात दुष्काळ पडला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत कापसाच्या उत्पादनात तब्बल वीस टक्क्यांनी घट होणार आहे. मित्रांनो अमेरिका हा एक प्रमुख कापूस उत्पादक देश आहे. या परिस्थितीत प्रमुख कापूस उत्पादक देशात कापसाची कमतरता भारतीय कापसाला झळाळी मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.
याशिवाय जाणकार लोकांनी बहुमूल्य माहिती देताना सांगितले की, या वर्षी आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तानमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली असल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. एका अंदाजानुसार या वर्षी पाकिस्तानमध्ये केवळ 60 लाख गाठींचे उत्पादन होणार आहे. मित्रांनो पाकिस्तान देखील एक प्रमुख कापूस उत्पादक देश आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान मध्ये देखील कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने भारतीय कापसाला झळाळी मिळणार आहे.
या दोन्ही बाबींचा विचार करता आणि भारतात कापसाचे चांगले उत्पादन पाहता, यावर्षी भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. जाणकार लोकांच्या मते, प्रमुख कापूस उत्पादक देशात कापसाचे उत्पादन घटणार असल्याने आणि भारतात कापसाचे उत्पादन वाढणार असल्याने भारतातून कापसाची भली मोठी निर्यात होणार आहे. देशांतर्गत कापसाला मागणी वाढणार असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील भारतीय कापसाला मागणी वाढणार असल्याने या वर्षी कापसाला हमीभावापेक्षा तीन ते चार हजार रुपये अधिक बाजार भाव मिळणार आहे.
दरम्यान सध्या महाराष्ट्रात कापूस हा साडेनऊ हजार रुपयांच्या खाली विक्री होत आहे. याबाबत व्यापारी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात आवक होत असलेला कापूस हा आद्रता असलेला कापूस आहे. अशा परिस्थितीत या कापसाला थोडा कमी बाजारभाव मिळत आहे. मात्र आगामी काळात चांगल्या कापसाला निश्चितच समाधानकारक बाजार भाव मिळणार आहे.
एकंदरीत आगामी दिवस हे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचे राहणार आहेत. या वर्षी कापसाला निश्चितच चांगला बाजार भाव मिळणार आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना येत्या काळात सुगीचे दिवस येऊ शकतात.