Cotton Farming : भारतात कापूस (Cotton Crop) हे एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. मित्रांनो 31 ऑगस्ट रोजी म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी राज्यातील जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.
यावेळी कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने कापसाला यावर्षी गेल्या वर्षांपेक्षा देखील अधिक बाजार भाव मिळण्याची आशा आहे. मात्र असे असले तरी कापूस पिकातुन शेतकरी बांधवांना (Farmer) चांगले उत्पादन (Farmer Income) मिळविण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
मित्रांनो खरे पाहता गेल्या वर्षी कापसाला सोन्यासारखा बाजार भाव मिळत होता. अनेक ठिकाणी फरदड कापसाला देखील चांगला समाधानकारक भाव मिळाला होता.
यामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी फरदड कापसाचे उत्पादन घेतले. अशा परिस्थितीत फरदड कापसामुळे गुलाबी बोंड आळीचे (Cotton Pink Bollworm) सावट यावर्षी अधिक राहणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांना गुलाबी बोंड अळीचे (Pink Bollworm) वेळीच नियंत्रण मिळवावे लागणार आहे. दरम्यान आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी गुलाबी बोंड आळी वर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया डोमकळी किंवा गुलाबी बोंड आळी नियंत्रण पद्धत.
गुलाबी बोंड अळी कीटक नियंत्रण कसे करणार बर
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी कडुलिंबापासून तयार केलेल्या सेंद्रिय कीटकनाशकाची फवारणी 7 ते 10 दिवसांच्या अंतराने करावी.
कडूनिंब आधारित कीटकनाशक 150 लिटर पाण्यात मिसळून कापूस पिकावर प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.
शेतकऱ्यांना हवे असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक कीटकनाशक एक लिटरमध्ये विरघळवून पिकावर फवारावे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, याच्या प्रतिबंधासाठी सकाळ संध्याकाळ कापूस पिकावर लक्ष ठेवावे.
शेतात फेरोमोन सापळा सतत ठेवल्यानेही या किडींच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका होऊ शकते.
लक्षात ठेवा कीटकनाशकांची फवारणी कृषी शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी.