Cotton Farming: भारतात मोठ्या प्रमाणात कपाशीची शेती (cultivation of cotton) केली जाते. आपल्या राज्यातही कापूस लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची (cotton crop) शेती गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.
राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण खरीप हंगामात (kharif season) लागवड केल्या जाणाऱ्या कापूस या पिकावर अवलंबून आहे. कापूस खरे पाहता एक नगदी पीक (cash crop) म्हणून शेतकरी बांधव (Farmer) लागवड करत असतो. या पिकातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बक्कळ पैसा देखील मिळत असतो.
मात्र असे असले तरी कापसाचे देखील इतर पिकाप्रमाणेच व्यवस्थापन (crop management) करावे लागते. आज आपण कापूस 80 दिवसाचा झाल्यानंतर काय काम केले पाहिजे तसेच कोणती औषध फवारले जाऊ शकतात याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी तिसरी फवारणी लागवडीनंतर 65 ते 80 दिवसाच्या कालावधी दरम्यान करावी. या तिसरी फवारणीमध्ये शेतकरी बांधव कोणत्याही एका प्रभावी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिकचा समावेश करू शकता.
शेतकरी मित्रांनो कीटकनाशक म्हणून प्रोफेक्स सुपर, आलीका, उलाला, पनामा, लोगर, लान्सर गोल्ड या औषधांची फवारणी केली जाऊ शकते. टॉनिक म्हणून टाटा बहार, इसाबियन, Fentak, प्लस, साफ, natobagin, बोरॉन किंवा 12:61:00 तसेच बुरशीनाशक म्हणून एन्ट्राकॉल आणि बाविस्टीन इत्यादी.
- उलाला (8ml) + इंट्राकॉल / साफ / बाविस्टीन + 12.61.00 (100gm) /
- आलीका (8-10ml) + इंट्राकॉल/ साफ / बाविस्टीन + 12.61.00 / बोरॉन
- लान्सरगोल्ड (30ml) + इंट्राकॉल / साफ / बाविस्टीन + 12.61.00 / बोरॉन
- रोगर (30ml) + इंट्राकॉल / साफ / बाविस्टीन + 12.61.00 / बोरॉन
वर दिलेल्या कोणत्याही एका कॉम्बिनेशनची आपण फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करणे अगोदर कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक राहणार आहे.