Cotton And Soybean Rate : तुम्हीही सोयाबीन किंवा कापूस लागवड केली आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर सोयाबीन आणि कापूस ही दोन्हीही पिके खरीप हंगामात उत्पादित केली जातात. या दोन्ही पिकांचे लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात खूपच उल्लेखनीय आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या दोन्ही पिकांची लागवड केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन आणि कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे.
याचे कारण म्हणजे गत दोन वर्षांपासून सोयाबीन अन कापूस पिकाची एकरी उत्पादकता कमी झाली आहे. विविध कारणांमुळे या दोन्ही पिकांमधून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. दुसरीकडे बाजारात ही दोन्हीही पिके हमीभावापेक्षा कमी दरात विकावी लागत आहेत.
अशा परिस्थितीत यंदा सोयाबीन आणि कापसाला काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे. अशातच आता कृषी विभागाने सोयाबीन आणि कापसाला यंदा काय भाव मिळू शकतो या संदर्भात एक अंदाज जारी केला आहे.
कापसाला काय भाव मिळू शकतो
यावर्षी केंद्रातील सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला 7121 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला 7521 रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे.
दरम्यान यंदा बाजारात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कापसाला सात हजार रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळू शकतो असा दावा काही बाजार अभ्यासकांनी केला आहे.
सोयाबीनला काय दर मिळणार?
यावर्षी केंद्रातील मोदी सरकारने सोयाबीन साठी 4892 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सोयाबीनला 4300 ते 5000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळू शकतो असा दावा केला जात आहे.
यावर्षी सोयाबीन उत्पादनात आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाही सोयाबीनचे बाजार भाव दबावातच राहणार असे दिसत आहे.