Cotton And Soybean Farming : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण कापूस आणि सोयाबीन पिकासाठी कोणत्या कंपनीचे तणनाशक उत्तम राहील याबाबत कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीविषयी जाणून घेणार आहोत.
कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकाचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत. कापसाबाबत बोलायचं झालं तर या पिकाची मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक लागवड केली जाते.
तसेच मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात याची लागवड होते.सोयाबीन हे मराठवाडा आणि विदर्भात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही याची लागवड नजरेस पडते.
सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. यावरून आपल्याला सोयाबीन आणि कापसाच्या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असल्याचे समजते. खरीप हंगामातील हे दोन्ही पीक शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत.
मात्र या पिकाच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची घट आली आहे. सोयाबीन आणि कापूस पिकातून जर चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर तण नियंत्रण करणे आवश्यक असते. यामुळे आज आपण या दोन्ही पिकांसाठी कोणत्या कंपनीचे तणनाशक प्रभावी ठरते याविषयी माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन पिकासाठी कोणते तणनाशक वापरावे?
बस्ता हे पेस्टिसाइड सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त ठरते. या तणनाशकाचा वापर उगवणीनंतर करावा. लव्हाळा व काही गवतवर्गीय रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी व्हीप सुपर ट्रान्स या तणनाशकाचा वीस दिवसांनी वापर केला पाहिजे.
शकेद नावाचे तणनाशक 20 ते 22 दिवसांनी फवारले जाऊ शकते. आयरिश नावाचे तणनाशक क्रियाशील घटक १६.५ % याचे हेक्टरी प्रमाण १ लिटर एवढे घेऊन ५०० ली. पाण्यातून १८ तें २२ दिवसांनी फवारावे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
कापूस पिकासाठी कोणते तणनाशक फवारावे?
पिकातील गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी टर्मा सुपर तणनाशक ५% इसी, हेक्टरी प्रमाण १ मिली, ५०० लिटर पाण्यातून १५ ते २० दिवसांनी फवारले जाऊ शकते. बस्ता नावाचे तणनाशक सर्व पिकांसाठी चालते कापूस पिकासाठी देखील हे तणनाशक चालू शकते. तथापि कोणतेही तणनाशक निवडण्याआधी कृषी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.