Cotton And Soybean Anudan : गेल्या वर्षी खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2023 च्या खरिपात ज्यांनी सोयाबीन आणि कापसाची लागवड केली होती त्यांना किमान एक हजार रुपयांपासून ते कमाल दहा हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.
वीस गुंठ्यांपेक्षा कमी जमिनीत ज्यांनी पीक लागवड केली असेल त्यांना किमान एक हजार रुपये आणि ज्यांनी दोन हेक्टर जमिनीवर पीक लागवड केले असेल त्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे 10,000 चे अनुदान दिले जाणार आहे.
यासाठीची कार्यवाही देखील सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सोयाबीन आणि कापूस पिकाच्या अनुदानासाठी कोणकोणते शेतकरी पात्र राहणार याच्या याद्याही समोर आल्या आहेत. गावागावांमध्ये सध्या याच यादी बाबत चर्चा रंगली आहे.
पण, काही शेतकऱ्यांचे या यादीमध्ये नाव आहे तर काही शेतकऱ्यांचे या यादीमध्ये नाव नाहीये. यामुळे शेतकरी संभ्रमा अवस्थेत आहेत. आमचे नाव का आले नाही असा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.
पण, फक्त ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ५८ लाख ७२ हजार २१४ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आणि ३१ लाख २३ हजार २३१ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.
मात्र गेल्या वर्षी अनेकांनी ई-पीक पाहणी केलेली नव्हती. यामुळे असे शेतकरी पात्र असूनही अपात्र ठरू नये यासाठी सरकारने ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे.
म्हणजे ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदानाच्या यादीत नाव नसेल त्यांनी तलाठ्याकडे अनुदानासाठी अर्ज करायचा आहे. याची पडताळणी तलाठ्याकडून केली जाणार आहे. तसेच अशा शेतकऱ्यांची स्वातंत्र्य यादी तयार करून ती कृषी विभागाकडे पाठवली जाणार आहे.
कृषी विभाग या यादीतील सर्व शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते, संमती पत्र अशी कागदपत्रे गोळा करून या यादीला अंतिम रूप देईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हणून जर तुमचे अनुदानाच्या यादीत नाव आले नसेल तर तुम्ही आजच तलाठ्याकडे जाऊन कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळणेबाबत अर्ज करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी गाव पातळीवर लावण्यात आलेल्या ई-पीक पाहणीच्या यादीत नाव नसल्यास पण गेल्यावर्षी कापूस, सोयाबीनची लागवड केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे अर्ज करावा, असे आवाहन यावेळी केले आहे.
यामुळे जर तुमचंही यादीत नाव नसेल तर तुम्ही सर्वप्रथम तलाठ्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तलाठ्याकडे अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. पण तुम्ही अर्ज केलाच नाही तर तुम्हाला या योजनेचे अनुदान मिळणार नाही. यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने गाफिल राहू नये, अन्यथा पात्र असूनही तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही.