Cotton Rate : गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये चीनमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार आणि सोयाबीन समवेतच कापूस दरात मोठी वाढ होणार अशा आशयाचे वृत्त झपाट्याने व्हायरल होत आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून बाजारातील परिस्थिती काही औरच आहे. दिवसापासून सातत्याने बाजारात कापसाच्या भावात घसरण होत आहे. यामुळे उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचे चित्र आहे.
आजही राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस दर साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास नमूद करण्यात आला आहे. गत महिन्यात 9000 रुपयांहुन अधिक दरात कापसाची विक्री होत होती मात्र आता दरात पाचशे रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे कापूस उत्पादकांची डोकेदुखी साहजिकच वाढत आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना या हंगामात गेल्या हंगामाप्रमाणेच अधिक दर मिळणार अशी आशा असल्याने तूर्तास बाजारात कापसाची आवक कमी आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कापूस बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमधील कापूस दराची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आष्टी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 587 क्विंटल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8000 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान ; 8600 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल तसेच सरासरी बाजार भाव 8500 नमूद झाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- उमरेड एपीएमसी मध्ये आज 438 क्विंटल लोकल कापसाचे आवक झाली. आजच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8370 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान ; 8525 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल तसेच सरासरी बाजार भाव 8400 नमूद झाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- गेल्या महिन्यात देऊळगाव राजा एपीएमसीमध्ये कापसाला तब्बल साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळत होता. आज मात्र या एपीएमसीमध्ये कापूस दरात मोठी घसरण झाली आहे. या एपीएमसी मध्ये आज 300 क्विंटल लोकल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला 8600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8780 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8780 नमूद झाला आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 165 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान ; 8650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल तसेच सरासरी बाजार भाव 8500 नमूद झाला आहे.
कोपर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 545 क्विंटल एवढी लोकल कापसाचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 8300 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 8500 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8400 नमूद झाला आहे.