Chilli Farming : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक फायदा मिळावा यासाठी भारतीय कृषी संशोधकांच्या माध्यमातून वेगवेगळे शोध लावले जातात.
विविध पिकांचे नवनवीन वाण विकसित केले जातात. कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या विविध पिकाच्या जाती विकसित केल्या जात आहेत. भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी हिरव्या मिरचीच्या देखील अनेक जाती विकसित केल्या आहेत.
दरम्यान जर तुम्हीही हिरव्या मिरचीची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण हिरव्या मिरचीच्या अशा एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.
विशेष म्हणजे या जातीचे बियाणे शेतकऱ्यांना घरपोच उपलब्ध होणार आहे. खरंतर हिरव्या मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत हिरव्या मिरचीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाला पीक लागवडीला प्राधान्य देणारे शेतकरी मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र मिरचीच्या पिकातून जर भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित वाणाची लागवड होणे आवश्यक आहे.
हेच कारण आहे की आज आपण मिरचीच्या अशाच एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
मिरचीचे सुधारित वाण
आज आपण हिरव्या मिरचीच्या पुसा सदाबहार या सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची बारामाही लागवड करता येणे शक्य आहे. म्हणजेच या जातीच्या मिरचीची कोणत्या हंगामात सहजतेने लागवड करता येणे शक्य आहे.
विशेष म्हणजे या जातीपासून शेतकऱ्यांना इतर जातींच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. हिरवा मिरचीचा हा वाण साधारणता 150 ते 200 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होतो.
अर्थातच पीक परिपक्व कालावधी हा इतर जातींच्या तुलनेत कमी आहे. या जातीपासून हेक्टरी 35 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बियाणं येणार घरपोच
शेतकऱ्यांसाठी या जातीची बियाणे घरपोच उपलब्ध करून दिले जात आहे. या जातीच्या मिरचीचे 25 ग्रॅम बियाण्याचे पॅकेट 37 रुपयांना मिळते. https://www.mystore.in/en/product/crop-nsc-chilli-variety-pusa-sadabahar या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक शेतकऱ्यांना या जातीचे बियाणे घरपोच मागवता येणार आहेत. संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला बियाणे ऑर्डर करावे लागेल आणि यानंतर हे बियाणे तुमच्या घरी पोहोच केले जाईल.