Chana Price Update : हरभरा हे रब्बी हंगामात उत्पादित केला जाणार एक मुख्य पीक. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरम्यान आता ज्या शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात हरभरा पेरणी केली आहे अशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदा हरभरा दरात तेजी राहणार असल्याचा दावा केला गेला आहे.
सध्या स्थितीला बाजारात हरभऱ्याला चांगला दर मिळत असून यंदा हरभरा लागवड घटली असल्याचे चित्र असल्याने या हंगामातील हरभरा अधिक दरात विक्री होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असले तरी सध्या स्थितीला हरभरा लागवड कमी झाली आहे की गेल्यावर्षीप्रमाणेच आहे याबाबत कोणतीच स्पष्टोक्ती आलेली नाही.
परंतु तज्ञ लोकांनी गेल्या वर्षी प्रमाणे यंदा हरभऱ्याला कमी दर मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खरं पाहता सद्यस्थितीला गेल्या हंगामातील हरभरा बाजारात येत असून त्याचा दर्जा खालावलेला आहे. पुणे दिल्ली मुंबई कोलकत्ता यांसारख्या बाजारात त्याची आवक देखील कमी झाली आहे.
अशा परिस्थितीत सध्या 5100 ते 5300 दरम्यान हरभरा दर पाहायला मिळत आहेत. गेल्या हंगामात हरभरा उत्पादनात घट झाली असल्याने आणि बाजारात अतिशय कवडीमोल दर मिळाला असल्याने ज्या शेतकरी बांधवांनी हरभरा पेरणी केली त्यांना मोठा फटका बसला. यामुळे यंदा हरभरा पेरणी घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
तज्ञ लोकांचा हा अंदाज बऱ्याच अंशी सत्यात उतरला आहे. गेल्यावर्षी 109 लाख हेक्टरवर पेरणी झाली तर यंदा मात्र 108 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. अजून पेरणीचा अंतिम आकडा सार्वजनिक झालेला नाही मात्र यामध्ये अजून घट होऊ शकते मात्र हा आकडा वाढणार नसल्याच तज्ञांचे मत आहे.
याशिवाय यंदा हरभरा उत्पादन कमी राहू शकतं असं देखील काही जण नमूद करत आहेत. खरं पाहता हरभरा पिकाला थंडी आवश्यक असते. परंतु डिसेंबर मध्ये यंदा कमी थंडी पडली असल्याने याचा कुठे ना कुठे पीक वाढीवर विपरीत परिणाम झाला.
याशिवाय प्रमुख हरभरा उत्पादक राज्य मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यात घाटे अळी आणि मररोगाचा प्रादुर्भाव हरभरा पिकावर प्रकर्षाने जाणवला. यामुळे उत्पादनात घट होईल असं मत व्यक्त होऊ लागल आहे. दरम्यान सध्या हरभरा पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.
यामुळे पुढील महिन्यात किती नुकसान होते यावर उत्पादनाची स्थिती अवलंबून राहणार आहे. मात्र सद्यस्थितीला पिक ज्या अवस्थेत आहे, त्यानुसार 100 ते 120 लाख टन हरभरा उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत उत्पादनात थोडी घट होणार आहे. शिवाय सद्यस्थितीला बाजारात गुणवत्तापूर्ण हरभरा पाहायला मिळत नाहीये.
तरीदेखील हरभरा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगल्या किमतीत विकला जात आहे. काही जाणकार लोकांच्या मते सध्या हरभरा तेजीत आहे कारण की बाजारात आवक खूप कमी आहे. यामुळे भविष्यात हरभरा दरात किती तेजी राहील हे सर्वस्वी हरभरा उत्पादनावर तसेच नाफेडच्या साठ्यावर अवलंबून राहणार आहे.
मात्र मागणीच्या तुलनेत हरभऱ्याचे यंदा उत्पादन कमी झालं तर निश्चितच दरात तेजी राहणार आहे. एकंदरीत गेल्यावर्षीच्या प्रमाणे हरभऱ्याला कमी दर मिळणार नाही असं जाणकारांचे म्हणणं असून यामुळे कुठे ना कुठे पीक वाढीच्या अवस्थेत असताना हरभरा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.