Cauliflower Farming: आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Agriculture) करत असतात. अल्प कालावधीत आणि कमी खर्चात भाजीपाल्याचे उत्पादन घेता येणे शक्य असल्याने शेतकरी बांधव अलीकडे भाजीपाला लागवडीकडे (Vegetable Farming) सरसावले आहेत.
आपल्या राज्यातील शेतकरी देखील आता काळाच्या ओघात हंगामी पिकांची शेती (Seasonal Crop) करू लागला आहे. यामध्ये भाजीपाला शेती आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. आपल्या राज्यात फुलकोबीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड (Cauliflower) केली जाते.
अशा परिस्थितीत आज आपण फुलकोबीच्या काही सुधारित जातींची (Cauliflower Variety) माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया फुलकोबीच्या काही प्रगत जाती.
फुलकोबीच्या काही प्रगत जाती
Syngenta C – 6015:- या जातीची पाने निळ्या-हिरव्या रंगाची आणि फळे मलईदार पांढरी असतात. फळे एकसमान घुमट आकाराची असतात. हे रोप लावल्यानंतर 60 ते 65 दिवसांत परिपक्व होते. या जातीच्या फळांचे अर्थात फुलकोबीचे वजन 1000 ते 1500 ग्रॅम पर्यंत असते. खरीप हंगामात लागवड केली जाते.
Syngenta C-6041:- या जातीची फळे मलईदार पांढरी आणि पाने निळ्या-हिरव्या रंगाची असतात. फळे एकसमान आणि घुमट आकाराची असतात. हे रोप लावल्यानंतर 60 ते 65 दिवसांत परिपक्व होते. फळाचे वजन 600 ते 750 ग्रॅम पर्यंत असते. रब्बी, खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवड केली जाते.
Nuziveedu NCFH – 6002:- ही कमी उत्पन्न देणारी सुधारित वाण आहे. फळे आकर्षक, मलईदार पांढरी आणि पाने गडद हिरवी असतात. फळे जड आणि घुमट आकाराची असतात. लावणीनंतर 75 ते 80 दिवसांत पीक काढणीसाठी तयार होते. फळाचे वजन 1000 ग्रॅम पर्यंत असते. रब्बी, उन्हाळी व खरीप हंगामात याची लागवड करता येते.
Nuziveedu – स्नो व्हाइट:- या जातीची फळे आकर्षक पांढरी आणि पाने हिरव्या रंगाची असतात. फळे घुमट आकाराची असतात. हे रोप लावल्यानंतर 70 ते 75 दिवसांनी पूर्ण तयार होत असतात. फळाचे वजन 1000 ते 1200 ग्रॅम पर्यंत असते. रब्बी, उन्हाळी व खरीप हंगामात लागवड केली जाते.
DEPTI – F1:- या जातीची पाने हिरवी आणि फळे पांढरी असतात. झाडे सरळ असतात आणि फळे घुमटाच्या आकाराची असतात. लावणीनंतर 60 ते 70 दिवसांत ते पूर्णपणे पिकते. फळाचे वजन 800 ते 1000 ग्रॅम पर्यंत असते. खरीप हंगामात याची प्रामुख्याने लागवड केली जाते.