Cabbage Farming: भारतात सध्या भाजीपाला पिकाची (Vegetable Farming) शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. भाजीपाला पिकं (Vegetable Crop) कमी दिवसात काढणीसाठी तयार होत असल्याने आणि कमी खर्चात करता येत असल्याने शेतकरी बांधव (Farmer) आता मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड करत असल्याचे चित्र आहे.
आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. मित्रांनो कोबी (Cabbage Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. त्याची लागवड देखील शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे. उत्तर प्रदेश राज्यातील हर्दोई जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी देखील कोबीची शेती फायदेशीर ठरत असून जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी रामजीवन यांनी कोबी शेती मधील काही बारकावे देखील सांगितले आहेत.
रामजीवन यांनी सांगितले की, ते खूप दिवसांपासून कोबीची लागवड करत आहेत. त्यांच्या मते, कोबी पावसाळ्याच्या दिवसात महागात विकली जाते. शेतकऱ्याने सांगितले की, सध्या कोबीचे पीक 4 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले जात आहे. ज्यातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे.
सध्या कोबी हे हातोहात आणि चांगल्या बाजार भावात विकले जाणारे पीक बनले आहे. हरदोई व्यतिरिक्त मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि बिहारमधील सिवानसह लखनौ, कानपूर आणि आग्रा येथे त्यांची कोबी जात आहे. जवळच्या कन्नौज जिल्ह्यातील अनेक मोठे व्यापारी त्यांच्याशी संपर्क साधतात आणि शेतातूनच पीक खरेदी करतात. कोबीची लागवड 100 ते 120 दिवसांची असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
जमिनीची तयारी कशी केली जाते?
सुमारे एक हेक्टरमध्ये 300 क्विंटल कोबी पिकाची आवक होत असल्याचे रामजीवन यांनी सांगितले. शेत तयार करण्यासाठी तो प्रथम शेत नांगरतो आणि नंतर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेतात शेणखत टाकतो. माती भुसभुशीत केल्यानंतर शेतातील जुन्या पिकांचे अवशेष शेतातून काढून टाकले जातात.
यानंतर जमीन समतल केली जाते आणि ठराविक आकाराचे बेड तयार करून कोबीची रोपे लावली जातात. रोपांचे अंतर सुमारे 40 सेमी ठेवले जाते. शेत तयार करताना 110 किलो पालाश, 110 किलो नायट्रोजन आणि 25 किलो स्फुरद एक हेक्टरमध्ये मिसळले जाते.
किती बियाण लागत
सोयीनुसार, शेतातील ओलावा लक्षात घेऊन, कोबीच्या पिकाला पाणी दिले जाते. सुमारे एक हेक्टरमध्ये 600 ग्रॅम बियाणे वापरले जाते, असे शेतकऱ्याने सांगितले. वालुकामय चिकणमाती असलेल्या जमिनीत कोबीच्या लागवडीचा सल्ला त्यांनी दिला आहे. शेतातील मातीचा pH साधारण 7 दरम्यान असावा. तण व कीड नियंत्रणासाठी वेळेवर शेताची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. कोबी लागवडीमुळे त्यांची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारली आहे.