Business Success Story : देशातील उच्चशिक्षित तरुण-तरुणी उच्च शिक्षणानंतर चांगल्या नामांकित कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात. चांगल्या कंपनीत आणि लाखो रुपयांची नोकरी मिळाली तर आयुष्य सेट होईल अशी मानसिकता तरुणांची असते. मात्र आज आपण अशा एका उद्योगपती दांपत्याविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी लाखो रुपये पगार असलेल्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत व्यवसायाला सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे यां दांपत्याने आपल्या कष्टाच्या जोरावर व्यवसायात अल्पकालावधीत उत्तुंग भरारी घेतली आहे. या बिझनेस कपलने अवघ्या काही वर्षांत शंभर कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. लाखोंच्या नोकरीला लाथ मारून कोट्यावधींचा व्यवसाय या दांपत्याने मोठ्या थाटात उभा केला असून या व्यवसायावर देशातील यशस्वी उद्योगपती रतन टाटा यांनी देखील विश्वास व्यक्त केला आहे.
रतन टाटा यांनी या व्यवसायात करोडोंची गुंतवणूक केली आहे. आम्ही ज्या बिजनेस कपल बाबत बोलत आहोत ते आहेत अभिषेक गोयल आणि नेहा सिंग. या बिजनेस कपलने ट्रॅक्सन कंपनी सुरु केली आहे. खरंतर अभिषेक आणि नेहा बिझनेस सुरू करण्यापूर्वी नोकरी करत होते. दोघेही आपापल्या नोकऱ्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. पगार देखील लाखोंच्या घरात होता. मात्र नोकरीत असतानाच नेहा यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा जागृत झाली.
मग काय त्यांनी नोकरीला लाथ मारली आणि आपली स्वतःची कंपनी सुरू केली. ट्रॅक्सन कंपनीची त्यांनी सुरुवात केली. कंपनी सुरू केल्यानंतर मात्र सुरुवातीचे काही काळ त्यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक ठरले. कंपनी सुरू केली आणि पहिल्या वर्षी त्यांना कंपनीमधून अपेक्षित असा महसूल मिळाला नाही. साहजिकच यामुळे ते दोघेही नैराश्यात गेले. मात्र त्यांनी खचून न जाता आपले काम प्रामाणिकपणे सुरूच ठेवले.
अशातच त्यांच्या कंपनीवर देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी विश्वास दाखवला आणि कंपनीत मोठी गुंतवणूक केली. कंपनीची क्षमता पाहून रतन टाटांनी हात मिळवणी केली. त्यामुळे नेहा आणि अभिषेक यांचा विश्वास प्रचंड वाढला आणि त्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. ट्रॅक्सन ही एक डेटा ट्रेकिंग प्लॅटफॉर्म कंपनी आहे.
यां कंपनीत रतन टाटा, फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल, डिलिव्हरीचे साहिल, मोहनदास पै आणि नंदन यांनीही गुंतवणूक केली आहे. या कंपनीने 2022 मध्ये 10 मिलियन डॉलर्स पेक्षा जास्त कमाई केली आहे. म्हणजेच कंपनीने 2022 मध्ये 83 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. परिणामी कंपनीचे मूल्यांकन आता 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
नेहा सिंग आणि अभिषेक गोयल यांची संपत्ती देखील आता 26 कोटी रुपयांवर गेली आहे. निश्चितच या उद्योगपती दांपत्याने बिजनेसमध्ये मोठी चमकदार कामगिरी केली आहे यात शंकाच नाही. यामुळे या बिझनेस कपलची ही कहाणी इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहणार आहे.