Business Idea : भारताचा शेतकरी बांधव (Farmer) वेगवेगळ्या पिकांची शेती (Farming) करत आहेत. शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत नगदी पिकांच्या (Cash Crop) लागवडीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
मित्रांनो बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती करून शेतकरी बांधव आता चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) करत आहेत. व्हॅनिला (Vanilla Crop) देखील असंच एक पीक आहे. हे एक असे पीक आहे जे भारतातील सर्वात महाग पिकांपैकी एक मानले जाते. पण भारतात त्याचे उत्पादन कमी आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेती केली तर ते करोडपतीही होऊ शकतात. कारण त्यातून भरपूर नफा मिळतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला व्हॅनिलाच्या लागवडीबद्दल (Vanilla Farming) सविस्तर माहिती देऊ. व्हॅनिलाला भारतातच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये मागणी आहे.
आईस्क्रीम, केक, कोल्ड्रिंक्स, परफ्यूम आणि इतर सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. एका अंदाजानुसार, जगात बनवल्या जाणार्या आइस्क्रीमपैकी 40 टक्के आइस्क्रीम केवळ व्हॅनिला फ्लेवरचे असते.
व्हॅनिलाची लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा
व्हॅनिलाची लागवड करताना तापमान लक्षात ठेवा. त्याच्या लागवडीसाठी आर्द्रता, सावली आणि मध्यम तापमान (म्हणजे 25 ते 35 अंश सेल्सिअस) आवश्यक आहे. अशा तापमानात त्याच्या पिकापासून चांगले उत्पादन मिळू शकते. कोणत्याही पिकाच्या लागवडीसाठी माती महत्त्वाची भूमिका बजावते.
अशा स्थितीत भुसभूशीत माती या पिकाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. यासोबतच माती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असावी. एवढेच नाही तर जमिनीचे पीएच मूल्य 6.5 ते 7.5 दरम्यान असावे. शेतकरी व्हॅनिलाची लागवड करून 3 वर्षांनी नफा घेऊ शकतात, कारण त्याचे पीक 3 वर्षानंतर उत्पन्न देऊ लागते. जर तुम्ही या पिकाची 3 वर्षे चांगली काळजी घेतली तर हे पीक तुम्हाला करोडपती बनवेल.