Business Idea: हळदीच्या लागवडीबद्दल (Turmeric farming) तुम्ही ऐकलेच असेल. पण यातून मिळणाऱ्या कमाईबद्दल (farmer income) जर आपण म्हंटल की तुम्हाला याचा फायदा दरवर्षी लाखोंमध्ये नाही तर करोडोमध्ये होणार आहे, तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही.
पण हे पूर्णपणे खरे आहे. किंबहुना देशात सतत वाढत चाललेली लोकसंख्या, घरे आणि कारखाने यामुळे लागवडीखालील जमीन कमी होत आहे. अशा परिस्थितीत कमी शेतीतही अधिक नफा मिळविण्यासाठी नवीन शेती तंत्र (Farming technique) वापरणे आवश्यक आहे.
या तंत्राने एका एकरात 100 एकराचे उत्पादन मिळते
अशाच एका तंत्राला व्हर्टिकल फार्मिंग (vertical farming) म्हणतात. अशा प्रकारे शेतीशी संबंधित मोठ्या कंपन्या शेती करतात. लोकांचा असा दावा आहे की, या तंत्राद्वारे एक एकर जमीनीतून 100 एकर जमिनीएवढे उत्पादन मिळू शकते. तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हळदीची वर्टिकल फार्मिंग करून तुमच्या स्वप्नांना पंख देऊ शकता. यातून तुम्हाला मोठा फायदा होणारं आहे.
उभ्या शेतीबद्दल म्हणजे वर्टिकल फार्मिंग बद्दल जाणून घ्या
वर्टिकल फार्मिंगसाठी सर्वप्रथम तुम्हाला GI पाईपची गरज लागणार आहे. या पाईप्सवर 2-3 फूट खोल आणि 2 फूट रुंद लांब कंटेनर उभे केले जातात. प्रत्येक कंटेनरचा वरचा भाग उघडा राहतो. या ठिकाणी हळदीचे पीक घेतले जाते.
अशी केली जाते या टेक्निकने शेती
हळदीच्या वर्टिकल फार्मिंगसाठी पेटी 10-10 सेमी अंतरावर कर्णरेषेने ठेवली जाते. मातीच्या भांड्यात हळदीच्या (turmeric crop) बियांच्या दोन ओळी लावल्या जातात, काही वेळाने हळद फुटते. ते सरळ वरच्या दिशेने सरकते. जसजशी झाडाची वाढ होते तसतसे पाने बाजूने बाहेर येतात. हळद लागवडीसाठी उभी शेती सर्वोत्तम मानली जाते.
किती फायदा होईल
उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एका वर्षात 250 टन हळदीचे पीक असेल तर तुम्हाला 2.5 कोटी रुपये मिळतील. यात 70 ते 80 लाखांचा खर्च जरी गृहीत धरला तरी दीड ते अडीच कोटी रुपये सहज वाचू शकतात. यानंतर तुम्ही हळद पावडर बनवून विकू शकता.