Business Idea : भारत खरं पाहता कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र असे असले तरी देशातील शेतकरी बांधव (Farmer) कर्जाच्या ओझ्याखाली दाबला गेला आहे. शेतकरी बांधवांना शेतीत सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे घसरणारा नफा पाहता शेतकरी बांधव आता शेतीपासून (Farming) दुरावत आहेत.
या सगळ्यामध्ये अन्नदाता बळीराजा आपली पिके रस्त्यावर आणि नदीत फेकून देत असल्याच्या बातम्याही येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अनेक शेतकरी टोमॅटोचे पीक मोफत वाटताना किंवा रस्त्यावर फेकतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी अशी एक भन्नाट आयडिया घेऊन हजर झालो आहोत ज्यामुळे शेतकरी बांधवांना आपले सोन्यासारखे टोमॅटोचे पीक फेकण्याची वेळ येणार नाही. खरं पाहता आज आम्ही टोमॅटो फुड प्रोसेसिंग बिझनेस (Agriculture Business) विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.
भाव पडल्यावर शेतमाल फेकू नका तर हे काम करा
टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. आता शेतकऱ्यांना अन्न प्रक्रियेच्या (Food Processing Business) मदतीने चांगले उत्पन्न मिळू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक कंपन्या टोमॅटोपासून सॉस, चटणी आणि टोमॅटो प्युरी सारखे पदार्थ खरेदी करतात. या कंपन्या शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदीसाठी चांगले पैसे देतात.
ही उत्पादने तुम्ही स्वतः देखील बनवू शकता आणि बक्कळ कमाई करू शकता
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की, शेतकरी बांधव टोमॅटोपासून सॉस, चटणी आणि टोमॅटो प्युरी सारखे पदार्थ घरच्या घरी देखील तयार करू शकतात. यासाठी सरकार शेतकऱ्यांना ‘मायक्रो फूड इंडस्ट्री अपग्रेडेशन स्कीम’ अंतर्गत अशा प्रक्रिया युनिट्सची स्थापना करण्यासाठी सबसिडी देते. शेतकरी कृषी विज्ञान युनिटमधून पिकांवर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षणही घेऊ शकतात. याशिवाय कोणतीही प्रक्रिया काम करणाऱ्या खासगी कंपनीकडून शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळू शकते.
शेतमाल बऱ्याच काळासाठी साठवता येतात
देशात टोमॅटोसारखी पिके साठवण्यासाठी अनेक पद्धती उपलब्ध आहेत. त्यासाठी अनेक नवीन तंत्रेही आली आहेत. शेतकरी त्यांचा उत्पादन दीर्घकाळ साठवण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. जेव्हा बाजारात टोमॅटो किंवा इतर भाज्यांचे भाव कमी होतात तेव्हा शेतकऱ्यांनी उत्पादन कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे. नंतर जेव्हा पुन्हा भाव वाढतात तेव्हा शेतकरी आपला माल मंडईत विकू शकतो. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही एवढं नक्की.