Business Idea : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात नवनवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत. सरकारने देखील नवनवीन व्यवसायांना प्रोत्साहन दिले आहे. या नवनवीन स्टार्टअप मुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. खरंतर अनेकांना व्यवसाय सुरू करायचा असतो.
मात्र कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय त्यांना सापडत नाही. दरम्यान आज आपण कमी गुंतवणुकीत सुरू होणारा आणि चांगला नफा मिळवून देणाऱ्यां अशाच एका बिजनेस ची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण ज्या व्यवसायाची माहिती पाहणार आहोत तो व्यवसाय अवघ्या साडेतीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे यातून महिन्याकाठी चांगला तगडा प्रॉफिटही मिळवता येणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या व्यवसायाची सविस्तर माहिती.
कोणता आहे तो व्यवसाय?
आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे मसाला मेकिंग बिझनेस. मसाला बनवण्याचा व्यवसाय हा बारा महिने कमाई करून देणारा आहे. खरे तर भारतात मसाल्यांना मोठी मागणी आहे. प्रत्येक स्वयंपाक घरात मसाला लागतोच.
यामुळे मसाला मेकिंग बिजनेस हा एक फायदेशीर व्यवसाय ठरणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) ने या व्यवसायाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात मसाला उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो आणि यातून किती नफा मिळणार याची संपूर्ण ब्लू प्रिंट देण्यात आली आहे.
यानुसार, मसाला उत्पादन युनिट उभारण्यासाठी 3.50 लाख रुपये खर्च करावा लागणार आहे. या बिझनेस साठी 300 स्क्वेअर फूट जागेवर शेड तयार करावे लागणार आहे. यासाठी जवळपास 60,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
याशिवाय मसाला मेकिंग बिझनेस मध्ये काही मशीन देखील लागतील. या मशीन साठी चाळीस हजार रुपये खर्च करावा लागू शकतो. याशिवाय वर्किंग कॅपिटल म्हणून अडीच लाख रुपयांची गुंतवणूक लागणार आहे.
एकंदरीत हा संपूर्ण व्यवसाय साडेतीन लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होणार आहे. जर तुमच्याकडे एवढी अमाऊंट उपलब्ध नसेल तर तुम्ही पीएम मुद्रा योजनेचा लाभ घेऊन यासाठी पैशांची उपलब्धता करू शकता.
किती कमाई होणार
या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार साडेतीन लाख रुपये खर्च करून जर मसाला मेकिंग बिझनेसचे युनिट उभारले तर वर्षाला 193 क्विंटल मसाल्यांचे उत्पादन होऊ शकते. तसेच, 5400 रुपये प्रति क्विंटल दराने एका वर्षात एकूण 10.42 लाख रुपयांची विक्री होऊ शकते.
आता यासाठी येणारा सर्व खर्च वजा केल्यावर वार्षिक नफा 2.54 लाख रुपये होईल. म्हणजेच तुम्ही एका महिन्यात 21 हजार रुपयांहून अधिकचा नफा कमवाल. जर तुम्ही तुमच्या बिजनेसची योग्य पद्धतीने मार्केटिंग केली तर नफा आणखी वाढू शकतो.