Business Idea : भारतात फुलांची व्यावसायिक शेती (Farming) मोठ्या प्रमाणावर केली जाते. फुलांचा वापर सामान्यतः सुगंध आणि पूजेसाठी केला जातो, परंतु काही फुलांमध्ये औषधी गुणधर्म देखील असतात, ते औषध आणि तेल म्हणून देखील वापरले जातात.
करडईच्या पिकाच्या (Safflower Crop) बाबतीत देखील असंच काहीस आहे याच्या पिकाबद्दल बोलायचं झालं तर, ज्याच्या बिया, साल, पाने आणि फुलांच्या पाकळ्यांचा वापर तेलापासून सरबत बनवण्यासाठी केला जातो. पाणीटंचाई असलेल्या किंवा कमी पाऊस असलेल्या भागात करडईची शेती (Safflower Farming) केल्यास शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो. हेच कारण आहे की याची आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली होती. नांदेड जिल्ह्यात अनेक शेतकरी बांधव (Farmer) या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत.
करडईचा उपयोग काय
करडईच्या फुलांपासून, त्याच्या वनस्पतीचा प्रत्येक भाग खूप उपयुक्त आहे. तेल आणि सरबत याशिवाय साबण, रंग, वार्निश, लिनोलियम आणि संबंधित पदार्थ त्यापासून बनवले जातात. करडईच्या फुलांपासून बनवलेले एसेंशियल ऑइल आणि मधही बाजारात खूप प्रसिद्ध आहेत.
करडई लागवडीसाठी योग्य वेळ
करडईच्या लागवडीसाठी 20 ते 25 अंश म्हणजे सामान्य तापमान योग्य असते, परंतु त्याच्या उगवणासाठी तापमान 15 अंश सेल्सिअस असावे. याची लागवड रब्बी हंगामात केली जाते आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रोपांची पेरणी किंवा पुनर्लागवडीचे काम केले जाते. यानंतर 4 ते 5 महिन्यांत फुलांचे बंपर उत्पादन सुरू होते.
करडईची पेरणी
करडईची फुले येण्यासाठी हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे पुरेसे आहे. पेरणीपूर्वी शेत तयार करणे आणि पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणे फायदेशीर आहे.
त्याच्या लागवडीसाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय आणि कंपोस्ट खताचा वापर करणे फायदेशीर आहे.
यानंतर, करडईच्या बिया लावण्यासाठी, ओळींमध्ये 45 सेंमी आणि रोपांमध्ये 20 सेमी अंतर ठेवावे, जेणेकरून खुरपणी आणि इतर शेतीची कामे करताना सोयीचे होईल.
कापणी करताना खबरदारी घ्या
करडईच्या पानांवर अनेक काटे असतात, त्यामुळे कापणी हातमोजे घालून केली जाते. हे काम सकाळी केले जाते, कारण यावेळी काटे मऊ असतात. यानंतर झाडांच्या फांद्या सुकल्यावर खालच्या फांद्यांची पाने काढून टाकली जातात. पीक काढणीनंतर 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून नंतर काठीच्या साहाय्याने करडईचे काम केले जाते.
करडईपासून मिळणार उत्पन्न
करडईच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर कंत्राटी शेती किंवा करडईची व्यावसायिक शेती करणे फायदेशीर ठरू शकते. प्रति हेक्टर करडईची लागवड केल्यास 9 ते 10 क्विंटल उत्पादन सहज मिळू शकते.
याच्या बिया, साल, पाने, पाकळ्या, तेल आणि सरबत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खूप जास्त किमतीत विकले जात आहे.
एवढेच नाही तर करडईच्या लागवडीसोबतच मधमाशी पालन करून तुम्ही अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकता.