Business Idea: शेती (Farming) हा एक बारा महिने चालणारा व्यवसाय आहे. यामध्ये आता काळाच्या ओघात बदल केला जात असला तरी देखील गेल्या अनेक वर्षांपासून काही पिकांची शेती भारतात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. करडई (Safflower Crop) हे देखील असंच एक आहे.
हे एक औषधी पीक आहे. याच्या बिया, पाने, पाकळ्या, तेल, हे सर्व औषधी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. याच्या फुलांच्या तेलाचा वापर उच्च रक्तदाब आणि हृदयरोगींसाठी फायदेशीर आहे. करडईच्या तेलाचा वापर साबण, पेंट, वार्निश, लिनोलियम आणि त्याच्याशी संबंधित पदार्थ तयार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. कमी पाणी असलेल्या भागात याची लागवड सहज करता येते.
हेच कारण आहे की, आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यात या पिकाची शेती (Safflower Farming) विशेष उल्लेखनीय आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded) बहुतांशी भागात या पिकाची शेती केली जाते. दुष्काळसदृश्य भागात याची लागवड केली जाते. या पिकाचे रोप 120 ते 130 दिवसांत उत्पादन देण्यास तयार होते.
कमी दिवसात तयार होत असल्याने या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर ठरत आहे. त्याच्या उगवणासाठी 15 अंश तापमान आणि 20-25 अंश तापमान चांगले उत्पादनासाठी चांगले आहे. पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यापर्यंत करावी, नाहीतर अधिक थंड हवामानात उगवणावर वाईट परिणाम होतो.
पेरणी कशी करावी बर…!
करडई पिकाच्या पेरणीसाठी एक हेक्टरमध्ये 10 ते 15 किलो बियाणे लागते. पेरणी करताना ओळीतील अंतर 45 सेमी आणि रोपातील अंतर 20 सेमी ठेवलं पाहिजे. शेतात पाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था असावी.
कापणी आणि मळणी
जेव्हा झाडाची देठं कोरडी असतात तेव्हा खालची पाने कापून टाका जेणेकरून झाडांना काटेरी पानांचा अडथळा न येता सहज पकडता येईल. सकाळी काढणी केल्याने काटे मऊ राहतात. याशिवाय काटेरी प्रजातीच्या पिकासाठी हातात हातमोजे बांधून काढणी करता येते. काढणी केलेले पीक 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्यानंतर काठीने मारले जाते.
किती उत्पन्न मिळणार बर
जर शेतकरी बांधवांनी एक हेक्टरमध्ये करडईची लागवड केली तर त्याला 9 ते 10 क्विंटल उत्पादन सहज मिळू शकते. याच्या बिया, साल, पाने, पाकळ्या, तेल, सरबत हे सर्व बाजारात चांगल्या दरात विकले जाते, ज्यातून शेतकरी भरघोस नफा (Farmer Income) कमवू शकतो.