Business Idea : देशात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शेतीसोबतच (Farming) शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) केले जात आहेत. यामध्ये कुक्कुटपालन (Poultry Farming) आणि बदक पालन यासारख्या व्यवसायांचा समावेश आहे.
मित्रांनो अलीकडे तितर (Quail Farming) या जंगली पक्षाचे देखील मोठ्या प्रमाणात पालन केले जात आहे. तितरमध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी विशेष लाभदायक सिद्ध होत असल्याने तितरची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत तितर पालन आपल्या देशात खूप लोकप्रिय होत आहे.
कमी खर्चात जास्त नफा (Farmer Income) मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) ते खूप लोकप्रिय होत आहे. तितर हा एक जंगली पक्षी आहे. त्याचे मांस मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि अतिशय चवदार मानले जाते. शिकारीमुळे तितर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत परवान्याशिवाय तितराची शिकार आणि संगोपन करण्यावर शासनाने (Government) बंदी घातली आहे. तीतर पाळायचे असेल तर सरकारकडून परवाना घ्यावा लागेल.
300 अंडी घालण्याची असते क्षमता
जाणकार लोकांच्या मते, तीतर एका वर्षात एकूण 300 अंडी घालण्यास सक्षम असतो. हा पक्षी जन्मानंतर 40 ते 45 दिवसांत अंडी घालतो. जन्माच्या 30 ते 35 दिवसांत तीतर 180 ते 200 ग्रॅमचे होतात. त्यांच्या मांसाला बाजारात खूप मागणी असते. यामुळे तितर बाजारात चांगल्या दरात विकले जातात.
अशा परिस्थितीत तितर पालन करून शेतकरी अवघ्या दोन महिन्यांत बंपर नफा कमवू शकतो. या पक्ष्यांच्या संगोपनासाठी शेतकऱ्याला जास्त भांडवल गुंतवावे लागत नाही. लहान आकार आणि कमी वजनामुळे अन्न आणि जागेची आवश्यकता देखील कमी असते. अशा परिस्थितीत 4 ते 10 तितरांचे संगोपन करून लहान व्यवसाय सुरू करता येतो.
पोषक तत्वांनी समृद्ध
त्याची अंडीही बाजारात वाजवी दरात विकली जातात. त्यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी आणि खनिजे भरपूर असतात. प्रति ग्राम अंड्यातील पिवळ बलक 15 ते 23 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आढळते. त्याच्या अंड्याचे सेवन अनेक रोगांमध्ये करण्याचा सल्ला दिला जातो.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, तितराच्या मांसाची विक्री सहज होते. तुम्ही ते जवळच्या कोणत्याही बाजारात सहज विकू शकता. एक तितर पक्षी 50 ते 60 रुपयांना सहज विकली जातो. बटेर किंवा तितराचे चांगल्या पद्धतीने संगोपन केल्यास तुम्हाला वर्षाला लाखोंचा नफा मिळू शकतो.