Business Idea: देशातील शेतकरी बांधव (Farmer) अलीकडे शेतीमध्ये मोठा आमूलाग्र बदल घडवून आणत भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) करत आहेत. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे भाजीपाला पिके (Vegetable crop) कमी कालावधीत तयार होत असल्याने शेतकरी बांधवांना कमी दिवसातच लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) यातून मिळत आहे.
यामुळे अलीकडे भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (vegetables farming) केली जाऊ लागली आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव देखील अल्प कालावधीत आणि कमी खर्चात काढणीसाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत.
भोपळा (pumpkin crop) हे देखील असच एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. याची देखील आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते राज्यातही भोपळ्याची कमी-अधिक प्रमाणात शेती बघायला मिळते. अशा परिस्थितीत आज आपण भोपळा पिकाच्या लागवडी बाबत (Pumpkin farming) काही महत्त्वाच्या बाबी आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन हजर झालो आहोत.
शेतकरी बांधवांनो, भोपळा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा बरं होणारं फायदा….!
जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांनी नेहमी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत भोपळ्याची लागवड केली पाहिजे. या पिकातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, ज्या जमिनीचा pH 5 ते 7 च्या दरम्यान आहे अशा जमिनीत या पिकाची शेती केली गेली पाहिजे.
पावसाळा हा भोपळा पिकाच्या लागवडीसाठी तसेच या पिकातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी उत्तम मानला जातो. या पिकाची झाडे सुमारे 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात चांगली वाढतात. जाणकार लोकांच्या मते भोपळा पिकाला दंवमुळे मोठी हानी होत असते. यामुळे थंडीच्या काळात त्याची लागवड न करण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात याची लागवड केल्यास उत्पादनात घट होते.
अशी शेती करावी लागणार रावं..!
भोपळा पिकाची लागवड करण्यासाठी प्रथम शेताची योग्य पूर्व मशागत करणे अतिशय आवश्यक असल्याचे जाणकार लोक नमूद करतात. पूर्व मशागत करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्व प्रथम शेतात व्यवस्थित नांगरणी करावी. नंतर शेतात खत टाकून भोपळ्याच्या बिया लावण्यासाठी बेड तयार करा. बियाणे पेरण्याची शिफारस मुख्यतः हाताने केली जाते. साधारणपणे, त्याच्या पिकाला भरपूर सिंचनाची आवश्यकता असते. मात्र शेतात पाणी साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते.
अवघ्या 3 महिन्यांत मोठी कमाई होणारं बरं….!
असे सांगितले जाते की, भोपळ्याचे पिकं अवघ तीन महिन्यांत उत्पादन देण्यास तयार होते. जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना सल्ला देताना सांगितले की, जर त्याचे फळ वरून पिवळसर पांढरे दिसले तर ते काढणीसाठी तयार असते असे समजावे. या भोपळ्याची हिरवी फळे 70 ते 80 दिवसांनी तोडता येतात.
एक हेक्टर शेतात 300 ते 400 क्विंटल भोपळ्याचे उत्पादन मिळते. भोपळ्याचा बाजारभाव 10 ते 15 रुपये किलो असला तरी शेतकरी एक पीक करून 4 ते 6 लाख कमवू शकतात. अशा पद्धतीने जर एक हेक्टर शेतजमिनीत शेतकरी बांधवांनी या पिकाची लागवड केली तर तीन महिन्यापर्यंत महिन्याकाठी शेतकरी बांधव दोन लाखांची कमाई करेल असे आपण समजू.