Business Idea : आजच्या काळात शेतीमध्ये (Farming) वेगळे काहीतरी करण्याची वेळ आली आहे. खरं पाहता बदलत्या काळात शेतीमध्ये अनेक शेतकरी बांधव (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन गोष्टी करत आहेत. आजकाल शेतकरी कोणाच्याही मागे राहिलेले नाहीत.
तेही आता व्यवहारिक दृष्टीकोन बाळगत पारंपारिक शेतीपासून दुरावत आहेत आणि नवीन आणि आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. शेतकरी बांधव आता बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची लागवड करून बक्कळ पैसा (Farmer Income) कमवत आहेत.
आता शेतकरी बांधव नगदी (Cash Crop) तसेच फळबाग लागवड करण्याकडे सरसावले असल्याचे चित्र आहे. अननस (Pineapple Crop) देखील एक प्रमुख फळपीक आहे. या फळाची लागवड (Fruit Farming) हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार आहे. अननसाच्या लागवडीबद्दल (Pineapple Farming) सांगायचे झाले तर, हे एक अतिशय फायदेशीर फळ आहे, कारण त्याची संपूर्ण बारा महिने लागवड करता येते आणि या फळाची मागणी बाराही महिने बाजारात असते.
भारतात अननस शेती नेमकी कुठं केली जाते बर
आपल्या देशात केरळ, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मिझोराम या राज्यांमध्ये अननसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. परंतु आता मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी देखील त्याचे उत्पादन करू लागले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही शेतकरी बांधव देखील या पिकाची शेती करत आहेत. भारतातील केरळ, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या पिकाची 12 महिने लागवड केली जात आहे.
अननस शेतीसाठी उपयुक्त हवामान नेमकं कोणतं बर…!
अननसाच्या लागवडीसाठी ओलसर हवामान लागते. सोप्या भाषेत सांगायचे तर, जिथे जास्त पाऊस पडतो तिथे या पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या पिकाची उष्णता सहन करण्याची क्षमता जास्त नसल्याने या पिकाला उष्ण प्रदेशात लावता येत नाही. अशा प्रदेशात अननस शेती केल्यास ती अयशस्वी ठरू शकते. अननसाच्या लागवडीसाठी 22 ते 32 अंशांच्या दरम्यान तापमान असावे.
अननस शेतीसाठी उपयुक्त माती नेमकी कोणती बर…!
वालुकामय चिकणमाती किंवा वालुकामय असलेली जमीन अननसाच्या लागवडीसाठी योग्य असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. मात्र पाणी साचलेल्या जमिनीत अननस पिकाची लागवड करता येत नाही. ज्या शेतजमिनीत अननस शेती करायची आहे त्या जमिनीचे मातीचे pH मूल्य 5 ते 6 च्या दरम्यान असावे असे जाणकार लोक नमूद करतात.
अननस लागवड नेमकी करावी तरी केव्हा
वास्तविक, अननसाची लागवड वर्षातून दोनदा केली जाते. जाणकार लोकांच्या मते, पहिली लागवड जानेवारी ते मार्च आणि दुसऱ्यांदा मे ते जुलै दरम्यान करता येते. पण दमट हवामान असेल तर बाराही महिने लागवड करता येते.
अननस पिकाच्या सर्वोत्तम जाती कोणत्या आहेत बर…!
भारतात अननसाच्या अनेक जाती लोकप्रिय आहेत. मात्र काही वाण असे आहेत जे चांगले उत्पादन देतात. जसे की जायंट क्यू, क्वीन, क्वीन, रेड स्पॅनिश, मॉरिशस या मुख्य जाती आहेत. या वाणांच्या गुणांबद्दल सांगायचे तर, अननसाची क्वीन ही फार लवकर परिपक्व होणारी जात आहे. जायंट क्यू या जातीची लागवड पसात केली जाते आणि लाल स्पॅनिश जातीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो.