Business Idea : आज आम्ही तुम्हाला एका अतिशय चांगल्या व्यवसायाबद्दल (Business) सांगणार आहोत. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. नोकरीत सुरक्षितता आणि उत्पन्न (Income) निश्चितच आहे. मात्र, यातून तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगू शकत नाही.
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसा असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत व्यवसाय करायचा असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही आपणास अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्या व्यवसायात तुम्हाला अत्यल्प खर्च करावा लागणार आहे आणि या व्यवसायातून तुम्हाला लाखोंची कमाई हमखास होणार आहे.
मित्रांनो आज आम्ही आपणास पर्ल फार्मिंग (Pearl Farming) अर्थात मोत्यांची शेती या व्यवसायाविषयी (Agriculture Business) सांगणार आहोत. मित्रांनो हा व्यवसाय मात्र 25 हजारात सुरू करता येतो आणि यातून जवळपास तीन लाखांची कमाई (Farmer Income) करता येणे शक्य आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पर्ल फार्मिंग (Farming) या व्यवसायाविषयी सविस्तर.
मोती शेती हा एक अतिशय मनोरंजक व्यवसाय आहे. शहरी भागात तर अनेकांना याची माहितीही नसते. मात्र, गेल्या काही वर्षांत याकडे लक्ष वाढले आहे. आपल्या महाराष्ट्रात या पर्ल फार्मिंग व्यवसायातून अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. त्याचबरोबर ओडिशा आणि बंगळुरूमध्येही याला चांगला वाव आहे. मोत्यांच्या शेतीतून मिळणारी कमाई प्रचंड आहे.
मोत्याच्या शेतीसाठी काय आवश्यक आहे?
मोत्यांच्या लागवडीसाठी तलावाची आवश्यकता असेल. यामध्ये ऑयस्टरची भूमिका महत्त्वाची आहे. मोती लागवडीसाठी राज्यस्तरावर प्रशिक्षणही दिले जाते. तलाव नसेल तर त्याचीही व्यवस्था करता येईल. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळू शकते. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील ऑयस्टरचा दर्जा खूप चांगला आहे.
मोती शेती कशी सुरू करावी?
मोती शेती सुरू करण्यासाठी कुशल शास्त्रज्ञांकडून प्रशिक्षण घ्यावे लागते. अनेक संस्थांमध्ये सरकारच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सरकारी संस्था किंवा मच्छिमारांकडून ऑयस्टर खरेदी करून शेती सुरू करता येते. तलावाच्या पाण्यात शिंपले दोन दिवस ठेवले जातात.
सूर्यप्रकाश आणि वाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर ऑयस्टर शेल आणि स्नायू सैल होतात. जेव्हा स्नायू सैल होतात तेव्हा ऑयस्टर शस्त्रक्रिया करून त्याच्या आत एक साचा टाकला जातो. जेव्हा साचा एखाद्या ऑयस्टरला टोचतो तेव्हा आतून एक पदार्थ बाहेर येतो. थोड्या दिवसानंतर, साचा मोत्याच्या आकारात तयार होतो. मोल्डमध्ये कोणताही आकार टाकून तुम्ही त्याच्या डिझाइनचा मोती तयार करू शकता. डिझायनर मोत्यांना बाजारात जास्त मागणी असते.