Business Idea: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र असे असताना देखील देशातील शेतकरी बांधव (Farmer) विशेषतः तरुण शेतकरी शेती (Farming) ऐवजी नोकरी धंद्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
शेतकरी बांधवांना याबाबत विचारले असता, शेतीमध्ये (Agriculture) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी शेतीपासून दुरावत असल्याचे सांगत आहेत. मात्र जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला आणि योग्य नियोजनाची सांगड घातली तर निश्चितच शेतीतून देखील लाखो रुपये कमावले जाऊ शकतात. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेतीमध्ये पिकांची लागवड केली पाहिजे.
शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आता नगदी पिकांची (Cash Crop) शेती केली पाहिजे. मित्रांनो मटर अर्थात वाटाणे (Pea Cultivation) हे देखील एक प्रमुख नगदी पीक आहे. आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मटर अर्थात वाटाणे शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया मटार लागवडीतील काही महत्त्वाच्या बाबी.
कमी खर्चात मटर लागवड करा
मित्रांनो मटरची शेती आपल्या देशातील अनेक राज्यांत केली जाते. आपल्या राज्यातही या पिकाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. या पिकातून शेतकरी बांधवांना समाधानकारक नफा मिळत असल्याने अलीकडे या पिकाच्या शेतीत वाढ झाली आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मटरची गणना डाळी पिकांच्या श्रेणीमध्ये केली जाते. लवकर म्हणजे आगात लावल्या जाणाऱ्या व पसात लावल्या जाणाऱ्या वाणांच्या आधारे त्याच्या लागवडीच्या वेळा ठरवल्या जातात.
मटारच्या आगात लावल्या जाणाऱ्या जातीची लागवड ऑक्टोबर महिन्यात केली जाते. त्याच वेळी, मटारच्या पसात लागवड केल्या जाणाऱ्या वाणांची लागवड नोव्हेंबरच्या शेवटी केली जाते. याच्या लागवडीला फारसा खर्च येत नाही, जर आपण पीक लावणीपासून ते सिंचनापर्यंतच्या खर्चाबद्दल बोलले तर एका हेक्टरमध्ये 25 ते 30 हजार रुपयांमध्ये लागवड करता येते.
कोणत्या प्रकारच्या जमिनीत त्याची लागवड करावी
आम्ही तुम्हाला सांगतो की, जर शेतकऱ्याने मटारची लागवड नियोजनपूर्वक केली तर त्याला त्यातून भरघोस नफा मिळू शकतो. याशिवाय मटारवर प्रक्रिया करून फ्रोजन मटारचा व्यवसायही सुरू करता येतो. कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर त्याची लागवड करता येते. तथापि, खोल चिकणमाती असलेली जमीन यासाठी योग्य मानली जाते. त्याचवेळी जमिनीचे पी.एच. मूल्य 6 आणि 7.5 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
लागवड कशी केली जाते बरं…!
मटार बियाण्यांद्वारे लावले जातात. यासाठी, ड्रिल पद्धतीचा वापर सर्वात योग्य आहे. बियाणे 5 ते 7 सेमी अंतरावर ओळीत लावले जातात. लक्षात ठेवा की, या पिकाला वेळोवेळी सिंचन आणि खत मिळते, त्यामुळे या पिकाची सतत वाढ होत राहते.
कापणी कधी करावी
वाटाणा रोपे लावणीनंतर 130 ते 140 दिवसांनी कापणीसाठी पूर्णपणे तयार असतात. रोपांची कापणी केल्यानंतर ते वाळवले जातात. वाळलेल्या धान्यांमधून बीन्स काढले जातात. एक हेक्टरमध्ये लागवड केल्यास 20 ते 25 क्विंटल उत्पादन सहज मिळू शकते. मटारचे भाव बाजारात सतत चढत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला एक हेक्टरमध्ये एक ते दीड लाखाचा नफा मिळू शकतो.