Business Idea Marathi : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करू लागले आहेत. कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. त्यावेळी अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
परिणामी, कोरोना काळात अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे व्यवसायात अनेकांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. तर काहींचे व्यवसाय काही कारणास्तव फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
खरे तर कोणताही स्टार्टअप सुरू करण्याअगोदर त्या स्टार्टअपची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच तो व्यवसाय नेहमी मागणीत राहील की नाही याची देखील चाचपणी केली गेली पाहिजे. शिवाय व्यवसायाच्या प्रमोशनसाठी आणि मार्केटिंगसाठी विशेष मेहनत घेणे आवश्यक आहे.
तरच व्यवसायात यशाला गवसणी घालता येते. दरम्यान, जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल पण कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नसेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
कारण की, आज आपण सोप मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस युनिट संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सोप मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस म्हणजेच साबण तयार करण्याचा व्यवसाय हा एक फायदेशीर बिजनेस ठरू शकतो.
हा व्यवसाय सुरू झाल्यानंतर अगदी डे वन पासूनच कमाई होणार असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. साबण हा प्रत्येकाच्या घरात लागतो. आंघोळीचा साबण, कपड्यांचा साबण, टॉयलेट सोप, लहान मुलांचे साबण, जनावरांचे साबण असे नानाविध साबणाचे प्रकार आहेत.
दरम्यान, तुम्हीही वेगवेगळे साबण तयार करून मार्केटमध्ये त्याची विक्री करू शकता आणि या व्यवसायातून चांगली कमाई करू शकता. विशेष म्हणजे हा बिजनेस कधीच मंदीत येणार नाही. या बिझनेसमधून तयार होणाऱ्या प्रॉडक्टची मागणी सर्वच घरात असल्याने या बिझनेस मध्ये मंदी येण्याची शक्यता खूपच कमी आहे.
किती गुंतवणूक करावी लागेल
हा व्यवसाय 1000 स्क्वेअर फुट जागेत सुरू केला जाऊ शकतो. या व्यवसायासाठी तुम्हाला काही लेबर फोर्स लागणार आहे. तसेच काही मशीन आणि रॉ मटेरियल देखील लागणार आहे. एक्सट्रूडर मशीन, डाय, मिक्सर मशीन, कटिंग मशीन यांसारखी मशीन लागणार आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला 7 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. सोबतच या बिझनेससाठी काही लायसन्स देखील काढावे लागतात.
किती कमाई होणार ?
साबुन मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय मधून 15% एवढा मार्जिन मिळवला जाऊ शकतो. जर सात लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू केला आणि योग्य स्ट्रॅटेजी युज करून या व्यवसायाची मार्केटिंग केली तर तुम्ही दरवर्षी सहा लाख रुपयांपर्यंतची कमाई या व्यवसायातून सहजतेने करू शकता.
अर्थातच महिन्याकाठी 50 हजार रुपयांची कमाई या व्यवसायातून होणार आहे. विशेष म्हणजे जेवढा सेल वाढेल कमाईचा आकडा तेवढाच वाढणार आहे. यामुळे व्यवसाय सुरू केल्यानंतर मार्केटिंगवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज राहणार आहे.