Business Idea: देशातील शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव (farmer) आता शेती नको रे बाबा असा ओरड करू लागले आहेत. नवयुवक शेतकरी पुत्र देखील शेती व्यवसायापासून (farming) आता दुरावत चालले आहेत.
नवयुवक शेतकरी पुत्र सध्या शेतीऐवजी नोकरीला प्राधान्य देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र जर शेती व्यवसायात काळाच्या ओघात अमुलाग्र बदल केला तर निश्चितच शेती देखील एक फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते.
अशा परिस्थितीत शेतकरीपुत्रांनी नोकरीऐवजी शेती व्यवसायात बदल केला तर त्यांच्यासाठी निश्चितच फायदेशीर राहणार आहे. आज आम्ही नवयुवक शेतकरी पुत्रांसाठी शेतीशी निगडित एका व्यवसायाची आयडिया (farming business idea) घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे मोती शेतीचा (pearl farming business) व्यवसाय. शेतकरीपुत्र मोती शेतीच्या माध्यमातून निश्चितच चांगली कमाई करू शकतील. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया मोती शेती विषयी काही महत्वाच्या बाबी.
मोतीच्या शेतीत किंवा पर्ल फार्मिंग मध्ये अतिशय कमी पैसे गुंतवून मोठा नफा कमावता येणे शक्य आहे. पर्ल फार्मिंग मध्ये केवळ 35 हजार रुपये गुंतवून 3 ते 3.5 लाख रुपये कमाई केली जाऊ शकते. पर्ल फार्मिंग सुरू करण्यासाठी शिंपल्याची आवश्यकता असते.
दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील ऑयस्टरची गुणवत्ता उत्तम असते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मध्य प्रदेशातील होशंगाबाद आणि मुंबई येथे मोती शेतीचे प्रशिक्षण देखील दिले जाते.
सरकार 50 टक्के अनुदान देते
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पर्ल फॉर्मिंग सुरू करायचे असेल तर तुम्हाला मोत्यांच्या लागवडीसाठी तलाव खणावे लागेल, त्यात ऑयस्टर टाकावे लागतील. यासाठी काही प्रशिक्षण आवश्यक असेल. तलाव खोदताना तुम्ही तुमच्या भागातील ग्रामप्रमुख किंवा सचिव यांच्याशी चर्चा केली, तर तलाव खोदण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदानही मिळते. मोत्यांच्या शेतीवर लोकांचे लक्ष खूप वाढले आहे आणि लोक लाखोंची कमाई देखील करत आहेत.
अशा ऑयस्टरपासून मोती तयार होतात
या शेतीमध्ये प्रथम अनेक शिंपल्यांना 10-15 दिवस जाळ्यात बांधून तलावात टाकले जाते, जेणेकरून ते तलावाच्या वातावरणात स्वतःला तयार करू शकतील. सुमारे 15 दिवसांनंतर, ते काढून टाकले जातात आणि शस्त्रक्रियेद्वारे एक कण किंवा साचा घातला जातो, ज्यावर कोटिंग केल्यानंतर ऑयस्टरचा थर तयार केला जातो. कणावर केलेला हा लेप नंतर मोती बनतो.
खर्च आणि नफा
आम्ही तुम्हाला सांगतो की, एक ऑयस्टर तयार करण्यासाठी 25-35 रुपये खर्च येतो. प्रत्येक शिंपल्यातून दोन मोती बाहेर पडतात. एका मोत्याची किंमत 150-200 रुपयांपर्यंत असू शकते. त्यामुळे तुम्ही एक छोटा तलाव खणून त्यात 1000 ऑयस्टर टाकले तर तुम्हाला 2000 मोती मिळतील.
जर सर्व ऑयस्टर जगले नाहीत तर अंदाजे 600-700 ऑयस्टर जगतील असे समजा. म्हणजेच तुम्हाला 1200-1400 मोती मिळतील. तुमचे हे मोती सुमारे दोन ते तीन लाख रुपयांना विकले जातील. तर 1 हजार मोत्यासाठी तुमचा खर्च सुमारे 25-35 हजार रुपये राहणार आहे. यामध्ये तलाव खोदण्याचा खर्च समाविष्ट नाही, कारण तो एकदाच होतो आणि त्यातही 50 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाते.