Business Idea : शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधव पीकपद्धतीत बदल करत नसल्यामुळे शेतकरी बांधवांना शेतीमध्ये (Agriculture) सातत्याने नुकसान होतं आहे.
अशा परिस्थितीत आता देशातील अनेक प्रयोगशील शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल स्वीकारायला सुरुवात केली आहे. आता बहुतांशी शेतकरी पारंपरिक पिकांपेक्षा नवीन तसेच बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देताना दिसतात.
विशेष म्हणजे यामुळे शेतकरी बांधवांना चांगला नफा (Farmer Income) देखील मिळत आहे. आले (Ginger Crop) हे देखील बाजारात कायम मागणी मध्ये असलेल्या पिकांपैकी एक आहे.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगाल, बिहार, चेन्नई, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये या पिकाची लागवड (Ginger Farming) मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण आले लागवडी विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.
आले लागवडीसाठी उपयुक्त हवामान नेमकं कसं
कृषी तज्ञांच्या मते, उष्ण प्रदेशात याची लागवड केली जाते. यासाठी, सरासरी 25 अंश ते 35 अंश तापमान योग्य आहे. त्याच्या शेतीसाठी पूर्वमशागत करताना, लक्षात ठेवा की तेथे पुरेशी ड्रेनेज व्यवस्था उपलब्धता असावी.
ज्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो तसेच शेतात पाण्याच्या निचर्याची योग्य व्यवस्था असल्यास पिकाचे नुकसान होतं नाही. वालुकामय चिकणमाती आणि चिकणमाती असलेल्या जमिनीत आल्याचे पीक चांगले वाढते आणि अशा जमिनीत लागवड केल्यास शेतकरी बांधवांना आले शेतीतून चांगली कमाई होऊ शकते.
आल्याची लागवड कशी करावी बर जाणून घ्या
आल्याच्या लागवडीतून बंपर उत्पादन हवे असल्यास तुम्ही आयआयएसआर, सुप्रभा, सुरुची, हिमगिरी, आयआयएसआर रजता या पिकांची पेरणी करू शकता. ही सर्व पिके 200 ते 230 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. 40 सें.मी.च्या अंतराने पेरणी करावी. दरम्यान, शेतात सतत ओलावा ठेवा, आले पिकासाठी ते खूप फायदेशीर ठरते.
अवघ्या 8 महिन्यांत काढणीस तयार होते
हे पीक 8 महिन्यांच्या अंतराने काढणीसाठी तयार होते. जेव्हा त्याच्या पानांचा रंग पिवळा होऊ लागतो, तेव्हा पीक काढणीसाठी पूर्णपणे तयार होते. शेतकऱ्यांनी रोपे काळजीपूर्वक उपटून टाकावीत आणि मुळापासून व मातीपासून राइझोम वेगळे करावेत.
आले शेतीतून आपण किती नफा कमवू शकता?
तज्ज्ञांच्या मते, आल्याची लागवड योग्य पद्धतीने केल्यास हेक्टरी 350 क्विंटलपर्यंत आल्याचे उत्पादन सहज मिळू शकते. एका हेक्टरमध्ये आले लागवडीसाठी सुमारे 7-8 लाख रुपये खर्च होऊ शकतात. सध्या बाजारात सुमारे 80 रुपये किलोने आले विकले जात आहे. 60 रुपये प्रतिकिलो या दराचा विचार केल्यास एका हेक्टरला 25 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल.