Business Idea: देशातील शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात (Agriculture) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र आहे. पारंपरिक पीक पद्धतीत शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याने आता नवयुवक शेतकरी पुत्र देखील शेती नको रे बाबा असा ओरड करत असल्याचे चित्र आहे.
मात्र जाणकार लोक शेतकरी बांधवांना सल्ला देताना सांगतात की, जर शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आणि पीक पद्धतीत बदल केला तर निश्चितच शेतीतून लाखो रुपयांची कमाई (Farmer income) होऊ शकते. जाणकार लोक शेतकरी बांधवांना नगदी पिकांची (Cash crops) शेती करण्याचा सल्ला देतात.
मित्रांनो आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका नगदी पिकाच्या शेती विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण अद्रक (Ginger crop) अर्थात आले या पिकाच्या शेतीविषयी (Ginger Farming) जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
अद्रक लागवड कशी केली जाऊ शकते बरं…!
अद्रक शेती शेतकरी बांधवांना फायदेशीर ठरू शकते. जाणकार लोकांच्या मते या पिकाची शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित असते. या पिकाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अद्रक चे पीक आंतरपीक म्हणून देखील इतर पिकांबरोबर लावले जाऊ शकते.
पपई सारख्या इतर फळबाग वर्गीय पिकांच्या झाडांमध्ये अद्रक आंतरपीक म्हणून लावले जाऊ शकते. जाणकार लोकांच्या मते सहा ते सात सामू अर्थात पीएच असलेल्या जमिनीत अद्रकची लागवड केल्यास या पासून चांगले उत्पादन मिळत असते. असे सांगितले जाते की एक हेक्टर जमिनीत आले लागवड करायची असल्यास शेतकरी बांधवांना दोन ते तीन क्विंटल आले कंद बियाणे म्हणून लागत असते.
अद्रक लागवड करण्याची पद्धत
जाणकार लोकांच्या मते, अद्रक लागवड करताना ओळीपासून ओळीतील अंतर 30-40 सेंमी ठेवले पाहिजे तसेच रोपामधील अंतर 25 सें.मी. ठेवले पाहिजे. या अंतरावर अद्रक पिकाची शेती केल्यास शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन मिळत असते. कृषी तज्ञांच्या मते अद्रक बियाणे किंवा कंद पेरणीनंतर हलकी माती किंवा शेणखताने झाकून टाकल पाहिजे.
याशिवाय ज्या जमिनीत अद्रक ची लागवड केली जाणार आहे ती जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी तसेच आले लागवड केलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी. कारण की अद्रक या पिकाला जास्त पाण्यामुळे हानी पोहोचण्याची शक्यता असते परिणामी उत्पादनात घट होऊ शकते.
अद्रक शेतीसाठी होणारा खर्च आणि आद्रक पिकातून मिळणारे उत्पन्न
जाणकार लोकांच्या मते, अद्रक पिक पेरणी केल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी यापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जर शेतकरी बांधवांनी आपल्या एक हेक्टर शेतीजमिनीत आल्याची लागवड केल्यास शेतकरी बांधवांना यातून जवळपास 150 ते 200 क्विंटलपर्यंत उत्पादन सहज मिळू शकते.
जाणकार लोक सांगतात की शेतकरी बांधवांना आपल्या एक हेक्टर जमिनीत आले लागवडीसाठी सुमारे 8 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मित्रांनो आले बाजारात कायमच मागणी मध्ये असते आणि अद्रकला 60 ते 80 रुपये किलो पर्यंतचा दर मिळतो. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांना 60 रुपये प्रति किलोचा दर मिळाला असे समजले तर आठ लाख रुपये खर्च करून एका हेक्टरमधून 25 लाखांपर्यंतची कमाई शेतकरी बांधव सहज करू शकतात.