Business Idea: जर्मन टर्निप (German turnip) ही एक रानभाजी आहे. या भाजीची भारतात उत्तर प्रदेश राज्यात अलीकडे व्यावसायिक स्तरावर शेती (farming) केली जात आहे. विशेष म्हणजे ही रानभाजी औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने तिला मोठी मागणी आहे.
अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी (farmer) या भाजीची शेती फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. ही रानभाजी कोबी (cabbage) सारखी दिसते मात्र कोबी पेक्षा छोटी असते. या रान भाजीची शेती दोन वर्षातून एकदाच होते. या रानभाजीची शेती उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि काश्मीर या राज्यात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या रानभाज्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही रानभाजी अमेरिका मध्ये देखील मोठ्या प्रमाणात सेवन केली जात आहे.
खरं पाहता ही शेती अधिक कालावधीनंतर काढणीसाठी तयार होत असल्याने या पिकाची शेती (vegetable farming) आपल्या भारतात कमी केली जाते. यामुळे या पिकाला बाजारात मोठी मागणी असते आणि चांगला बाजार भाव (market price) देखील मिळतो. थंड प्रदेशात या पिकाची शेती बारामाही बघायला मिळते. निश्चितच या पिकाची शेती शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देणारी आहे मात्र यासाठी जास्त कालावधी शेतकरी बांधवांना वाट पाहावी लागते.
जर्मन टर्निपचे फायदे जाणून घ्या..!
जंगली कोबी जर्मन टर्निप ही अगदी सामान्य भाजीप्रमाणे वापरली जाते. त्याची पाने कोशिंबीर सारखी खाल्ली जातात, तर त्यापासून बनवलेले पदार्थ देखील खूप चवदार असतात. तसे, हे कोबी कुटुंबातील सदस्य आहे, ज्यामध्ये ब्रोकोली, फुलकोबी, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि गै लॅन जर्मन सलगम यासारख्या भाज्यांचा समावेश आहे. त्याचा वरचा थर पांढरा, हलका हिरवा आणि जांभळा रंगाचा असून तो दिसायला आकर्षक आणि चवीला अप्रतिम आहे.
जर्मन टर्निप लागवड कशी केली जाते बरं…!
जाणकार लोकांच्या मते, या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रब्बी हंगाम हा सर्वोत्कृष्ट हंगाम आहे. भारतातील हवामान जर्मन टर्निप म्हणजेच जंगली कोबीच्या लागवडिसाठी योग्य असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता या पिकाला दव पडल्याने नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी जर या पिकाची शेती पॉलिहाऊस किंवा ग्रीनहाऊसमध्ये केली तर त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
चांगल्या उत्पादनासाठी हे जड चिकणमाती किंवा उच्च अम्लीय आणि क्षारीय जमिनीत देखील घेतले जाऊ शकते. लक्षात ठेवा की मातीचे pH मूल्य 6.5 ते 7.0 पर्यंत असावे.
प्रति हेक्टर जर्मन टर्निप वाढण्यासाठी किमान 1 ते 1.5 किलो बियाणे आवश्यक आहे, ज्यापासून रोपवाटिकेत सुधारित रोपे तयार केली जातात.
त्याची रोपवाटिका सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तयार केली जाते, जेणेकरून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत प्रत्यारोपण करता येईल.
जर्मन टर्निप लागवडीतून उत्पन्न किती मिळणार बरं…!
जर्मन टर्निप किंवा जंगली कोबीची प्रगत शेती केल्यास, त्याचे पीक केवळ 45 ते 60 दिवसांत तयार होते, ज्यामुळे 200 क्विंटल जाड उत्पादन मिळू शकते. जंगली कोबी बाजारात 40 ते 50 रुपये किलो दराने विकली जाते. अशा प्रकारे जर्मन टर्निप वाढवून तुम्ही 2 लाखांपर्यंत सहज कमवू शकता.