Business Idea: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) बदल करत आहेत. शेतकरी बांधव आता शेती समवेतचं शेती पूरक व्यवसाय (Agri business) तसेच गावात राहून सुरू करता येणारे व्यवसाय (Village Business Idea) मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र आहे.
जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना केवळ शेती व्यवसायावर (Agriculture) अवलंबून न राहता शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय करण्याचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे आता शेतकरी बांधव देखील प्रक्रिया उद्योगात आपला हात आजमावत आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी वाटाणा प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण फ्रोजन मटर व्यवसायाविषयी (Frozen peas business) जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या प्रक्रिया उद्योगाविषयी.
कसा सुरु करायचा हा व्यवसाय
जर तुम्ही शेतकरी असाल आणि वाटाणा पिकवत असाल तर तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. अन्यथा, हिवाळ्याच्या हंगामात शेतकर्यांकडून स्वस्त दरात वाटाणे खरेदी करून तुम्ही फ्रोजन मटारचा व्यवसाय सुरू करू शकता.
या वस्तूंची आवश्यकता भासेल
मित्रांनो अगदी लहान खोलीतूनही तुम्ही फ्रोझन मटारचा व्यवसाय सुरू करू शकता. लहान व्यवसाय सुरू करताना हिरवे वाटाणे सोलण्यासाठी काही मजुरांची गरज भासेल. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असेल तर 4000 ते 5000 चौरस फूट जागा आवश्यक आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर, आपल्याला वाटाणा सोलण्याच्या मशीनची आवश्यकता असेल. तसेच काही परवाने घ्यावे लागतात.
कसे बनतात फ्रोजन मटर
मटार सुमारे 90 अंश सेंटीग्रेड तापमानात उकळले जातात. यानंतर, हे धान्य तीन ते पाच अंश सेंटीग्रेड तापमानापर्यंत थंड पाण्यात टाकले जाते, जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. हे मटार नंतर 40 अंशांपर्यंत तापमानात ठेवले जातात, जेणेकरून मटारमध्ये बर्फ गोठतो. त्यानंतर मटार पॅकेटमध्ये भरून बाजारात पोहोचवले जातात.
फ्रोझन मटारपासून किती कमाई होणारं?
या व्यवसायातून लोकांना किमान 50 ते 80 टक्के नफा मिळतो. 10 ते 20 रुपये किलो दराने तुम्हाला शेतकऱ्यांकडून वाटाणा मिळेल. संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुम्ही एक किलो फ्रोझन मटार बाजारात 120 ते 200 रुपयांना विकू शकता.