Business Idea : अलीकडे शेती (Farming) व्यवसायात मोठा बदल केला जात आहे. विशेषता पीक पद्धत्तीत मोठा बदल केला जात आहे. आता शेतकरी बांधव (Farmer) नगदी पिकांच्या (Cash Crops) शेतीकडे अधिक वळत असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी आज एका नगदी पिकाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण जिऱ्याच्या शेतीविषयी (Cumin Farming) जाणून घेणार आहोत. खरं पाहता जिरे (Cumin Crop) एक प्रमुख मसाल्याचा पदार्थ असून भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात फोडणी घालण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच जिऱ्यात औषधी गुणधर्म असल्याने त्याची मागणी बाजारात बारामाही बघायला मिळते. अशा परिस्थितीत या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते.
जिऱ्याच्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या बर
जाणकार लोकांच्या मते, जिरे लागवडीसाठी हलकी आणि चिकणमाती असलेली जमीन अतिशय योग्य असते. अशा जमिनीत जिऱ्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळत असते. इतर प्रत्येक पिकाप्रमाणे या पिकासाठी देखील योग्यरीत्या पेरणीपूर्व मशागत करावी लागते. जिरे ज्या शेतात पेरायचे आहे त्या शेतातील तण काढून स्वच्छ करावे. याशिवाय जाणकार लोक जिऱ्याच्या सुधारित वाणांची लागवड करण्याचा सल्ला देत असतात.
जिऱ्याच्या सुधारित वाणांमध्ये तीन जातींची नावे प्रमुख आहेत. यामध्ये RZ 19 आणि 209, RZ 223 आणि GC 1-2-3 हे वाण चांगले मानले जातात. या जातींचे बियाणे 125 दिवसांत परिपक्व होतात. या जातींचे सरासरी उत्पादन 510 ते 530 किलो प्रति हेक्टर असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या वाणांची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न मिळवू शकणार आहेत.
जिऱ्याच्या सुधारित जातीच्या शेतीतून मिळणार उत्पन्न
आपल्या देशातील 80 टक्क्यांहून अधिक जिरे गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्पादित केले जात असल्याचे सांगितले जाते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 28 टक्के जिऱ्याचे उत्पादन एकट्या राजस्थानमध्ये होते. आता उत्पन्नाविषयी बोलायचे तर जिऱ्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी 8 क्विंटल एवढं आहे.
जिऱ्याच्या लागवडीवर हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपये खर्च येतो. जिऱ्याची किंमत 100 रुपये प्रतिकिलो धरल्यास हेक्टरी 40000 ते 45000 रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. अशा परिस्थितीत 5 एकर लागवडीत जिरे घेतल्यास 2 ते 2.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. निश्चितच या पिकाची शेती शेतकऱ्यांना लखपती बनवणार आहे.