Business Idea: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) काळाच्या ओघात आता मोठा बदल करीत आहे. पारंपारिक पिके (Traditional Crops) सोडून शेतकरी आता हळूहळू नवीन नगदी पिकांच्या (Cash Crops) लागवडीकडे वळत आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) देखील शेतकरी बांधव आता नगदी पिकांच्या शेतीकडे (Farming) अधिक आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. चिया सीड (Chia Seed Crop) हे देखील असंच एक नगदी पीक आहे. चियाला या नविन काळातील सुपरफूड देखील म्हटले जाते. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने बाजारात त्याचा भाव चांगला राहतो, शिवाय बारामाही मागणी देखील असते.
या नगदी पिकाची लागवड (Chia Seed Farming) कोणत्या हवामानात करता येणार बरं…!
चिया सीडचे पिक कोणत्याही प्रकारची माती आणि हवामानात उत्पादीत करता येतात. तथापि, चांगल्या निचऱ्याची हलकी आणि वालुकामय जमीन या पिकासाठी योग्य असल्याचा दावा जाणकार लोक करत असतात. या पिकाच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याच्या शेतीला मायबाप शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. खुद्द पंतप्रधानांनीही त्यांच्या मन की बातमध्ये या पिकाच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे.
हा महिना त्याच्या लागवडीसाठी योग्य आहे
याच्या शेतीच्या दृष्टीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने सर्वाधिक बेस्ट असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे. त्याची पेरणी माध्यमातून केली जाते. जर तुम्हाला एक एकरमध्ये चिया बियाणे पिकवायचे असेल तर सुमारे 4 ते 5 किलो बियाणे आवश्यक आहे.
एक एकर इतका खर्च येईल
सफाली तंत्रज्ञानाने एक एकर शेतात चिया बियाणे पिकवण्यासाठी 20 ते 30 हजार खर्च येतो. यासाठी 1 किलो बियाणे लागते, जे तीन महिन्यांत 1 क्विंटल उत्पादन देते.
7 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळतं बरं…!
त्याच वेळी, मुख्य पीक म्हणून बियाणे लागवडीसाठी 60-80 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांना अवघ्या तीन महिन्यांत 6-7 क्विंटल उत्पादन आरामात मिळते.
इतका नफा मिळणार बरं…!
आम्ही तुम्हाला सांगतो की, बाजारात चिया बियांची किंमत 1000 ते 2000 रुपये प्रति किलो आहे. जर तुम्ही एका एकरातून 6 ते 7 क्विंटल चिया बियांचे उत्पादन तीन महिन्यांत केले तर तुम्ही सहज 6 लाखांपर्यंत बंपर नफा मिळवू शकता.