Business Idea : भारतात आता पारंपारिक शेतीला (Traditional Farming) फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. पारंपारिक शेतीच्या तुलनेत आधुनिक युगाची शेती शेतकऱ्यांसाठी (Farmer) अधिक फायदेशीर ठरत आहे.
देशातील शेतकरी आता नवीन पिके किंवा नगदी (Cash Crops) तसेच औषधी पिकाच्या शेतीकडे (Medicinal Plant Farming) वळू लागले आहेत. शेतकरी बांधवांनी आता बाजारात जे विकेल तेच पिकवायला सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे.
कसावा (Cassava Crop) देखील एक नगदी पीक असून याला बाजारात मोठी मागणी असते यामुळे या पिकाची देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेती करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील या पिकाची शेती थोड्याबहुत प्रमाणात केले जाते. या पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला बक्कळ पैसा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कसावा लागवड (Cassava Farming) अधिक लोकप्रिय होत आहे.
कसावा पिकाचा साबुदाणा बनवण्यासाठी वापर केला जातो बर…!
भारतात कसावा बागायती तसेच नगदी पिकांच्या श्रेणीत गणला जातो. विशेष म्हणजे साबुदाणा (Sago Crop) बनवण्यासाठी कसावा वापरला जातो. यामुळे या पिकाला बाजारात चांगला दर मिळतो. जाणकार लोकांच्या मते पिकामध्ये असलेल्या स्टार्चचा वापर साबुदाणा बनवण्यासाठी केला जातो. या फळामध्ये स्टार्च मुबलक प्रमाणात असते. सध्या दक्षिण भारतात या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्या राज्यात देखील काही शेतकरी प्रयोग म्हणून या पिकाची शेती करत आहेत.
कसावा अगदी रताळ्यासारखा दिसतो बर..!
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, कसावा हा हुबेहूब रताळ्यासारखा दिसतो, पण त्याची लांबी त्यापेक्षा जास्त असते. रताळे आणि कसावा यातील फरक तुम्ही अचानक पाहिल्यावर तुम्हाला कळणार नाही. या फळामध्ये स्टार्च मुबलक प्रमाणात आढळतो.
पशुखाद्य म्हणूनही वापरता येते
साबुदाणा बनवण्याबरोबरच कसावाचा उपयोग पशुखाद्य म्हणून केला जातो. तज्ज्ञांच्या मते, जनावरांना कसावा खाऊ घातल्याने त्यांची दूध उत्पादन करण्याची क्षमता वाढते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंद पिकांप्रमाणेच कसावाची लागवड देखील मुळांची पुनर्लावणी करून केली जाते.
या जमिनीत त्याची लागवड करता येते बर…!
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधव सर्व प्रकारच्या मातीत आणि हवामानात कसावा लागवड करू शकतात. म्हणजे आपल्या भारतातील हवामान या पिकासाठी चांगले असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याची लागवड करताना शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की, ज्या शेतात लागवड केली जात आहे, तेथे पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असावी.
शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही एवढं नक्की
कसावा लागवडीमुळे शेतकऱ्यांचे कधीही नुकसान होणार नाही. देशात साबुदाणा मोठ्या प्रमाणात वापरला जातो, असे जाणकार सांगतात. त्यामुळेच कसावाची लागवड वेगाने होत आहे. अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांना जोडून या पिकाची कंत्राटी शेती करण्यास सुरुवात केली आहे.
याशिवाय इतर देशांमध्येही कसावा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढण्याची शक्यता आहे. जाणकार लोकांच्या मते साबुदाणा बनवण्यासाठी या पिकाचा वापर होत असल्याने या पिकाची शेती शेतकऱ्यांना बक्कळ पैसा देणारी ठरणार आहे.