Business Idea : देशात शेती व्यवसायात (Farming) मोठा बदल केला जात आहे. शेती व्यवसायात जर सातत्याने नुकसान सहन करावे लागत असेल तर पीक पद्धतीत बदल करणे अतिशय आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी (Farmer) वाचक मित्रांसाठी एका पिकाच्या शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो आम्ही ज्या पिकाच्या लागवडी बद्दल बोलत आहोत ते पीक आहे काजूचे पीक(Cashew Crop). आज आपण काजू शेतीबद्दल (Cashew Farming) काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो गेल्या काही काळापासून देशात कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत.
आता देशातील शेतकरी पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांवर (Cash Crops) अधिक भर देत आहेत. विशेष म्हणजे मायबाप शासन आपल्या स्तरावरुन शेतकऱ्यांना सातत्याने नगदी पिकांच्या लागवडीसाठी तसेच फळ पिकांच्या लागवडीसाठी जागरूक करत आहे. निश्चितच या पिकाची शेती करून शेतकरी चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळवू शकतात.
काजू हे ड्रायफ्रूट म्हणून खूप लोकप्रिय आहे. आपल्या भारतात काजूची मोठी मागणी असून त्याला चांगला बाजार भाव देखील मिळत आहे. काजूच्या झाडाची लांबी 14 मीटर ते 15 मीटर किंवा त्याहून अधिक असू शकते. त्याची झाडे 3 वर्षात फळ देण्यास तयार होतात. काजूशिवाय त्याची सालेही वापरली जातात. सालेपासून पेंट आणि स्नेहक तयार केले जातात. त्यामुळे त्याची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते.
काजूचे रोप उष्ण तापमानात चांगले वाढते. त्याच्या लागवडीसाठी योग्य तापमान 20 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे. याव्यतिरिक्त, ते कोणत्याही प्रकारच्या मातीवर घेतले जाऊ शकते. तरीही यासाठी लाल वालुकामय चिकणमाती चांगली मानली जाते. यामुळे आपल्या कोकणात काजूच्या बागा मोठ्या संख्येत आपल्याला बघायला मिळतात.
काजूची शेती भारतात कोणकोणत्या राज्यात केली जाते
मित्रांनो एका रिपोर्टनुसार, जगातील एकूण काजूच्या उत्पादनात भारताचा वाटा 25 टक्के आहे. भारताच्या एकूण काजू उत्पादनात महाराष्ट्राचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये अल्प प्रमाणात याची लागवड केली जाते. मात्र, आता झारखंड आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची लागवड केली जात आहे.
काजू शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे गणित समजून घ्या
जाणकार लोकांच्या मते, काजूची झाडे एकदा लावली की अनेक वर्षे फळ देतात. झाडे लावायला वेळ लागतो. एक हेक्टरमध्ये 500 काजूची झाडे लावता येतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, एका झाडापासून 20 किलो काजू मिळू शकतात. एका हेक्टरमध्ये 10 टन काजूचे उत्पादन होते. त्यानंतर प्रक्रियेचा खर्च येतो. बाजारात काजू 1200 रुपये किलोने विकला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त प्रमाणात रोपे लावलीत तर तुम्ही लखपतीच नव्हे तर करोडपती व्हाल.