Business Idea: मित्रांनो भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र असे असले तरी देशातील शेतकरी बांधव (Farmer) सातत्याने शेती व्यवसायात (Farming) नुकसान सहन करावे लागत असल्याने शेती (Agriculture) नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी पुत्र देखील आता शेतीपासून दुरावत चालला आहे.
मात्र जर शेती व्यवसायाला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर निश्चितच शेतकरी बांधव देखील लाखो रुपयांचे उत्पन्न सहज कमवू शकतो. अशा परिस्थितीत आज आम्ही आमच्या वाचक मित्रांसाठी एका शेती पूरक व्यवसायाची आयडिया घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो आज आम्ही केळीचे चिप्स बनवण्याच्या व्यवसायाविषयी (Banana Chips Making Business) सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा व्यवसाय केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Banana Grower Farmer) अधिक फायद्याचा ठरणार आहे. मात्र असे असले तरी इतर शेतकरी बांधव तसेच कोणीही हा व्यवसाय (Business) सहजरीत्या सुरू करू शकतो.
या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या व्यवसायासाठी अतिशय कमी भांडवल आवश्यक असते. तज्ञांच्या मते, हा व्यवसाय केवळ पन्नास हजार रुपये गुंतवणूक करून सुरू केला जाऊ शकतो आणि महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई याद्वारे केली जाऊ शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या भन्नाट बिझनेस आयडिया विषयी.
मित्रांनो केळीच्या चिप्स आरोग्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. यासोबतच लोक उपवासात केळीचे चिप्स मोठ्या प्रमाणात खातात. केळीच्या चिप्स बटाट्याच्या चिप्सपेक्षा जास्त प्रचलित आहेत, त्यामुळे या चिप्स मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. केळीच्या चिप्सचा बाजार आकार लहान असतो, त्यामुळे मोठ्या ब्रँडेड कंपन्या केळीच्या चिप्स बनवत नाहीत.
आणि यामुळेच केळीच्या चिप्स बनवण्याच्या व्यवसायात अधिक चांगला वाव आहे. भारतात अनेक लोक केळी चिप्सचा व्यवसाय करत आहेत. तथापि, केळी चिप्सचा बाजार आकार लहान आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या ते करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता.
केळी चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य
केळी चिप्स बनविण्याच्या व्यवसायासाठी विविध प्रकारची यंत्रसामग्री वापरली जाते आणि प्रामुख्याने कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल आणि इतर मसाले कच्चा माल म्हणून वापरतात. काही प्रमुख यंत्रसामग्री आणि उपकरणे खाली सूचीबद्ध आहेत.
केळी धुण्याची टाकी आणि केळी सोलण्याचे यंत्र
केळी कापण्याचे यंत्र
क्रंब फ्राईंग मशीन
स्पाइस मिलिंग मशीन
पाउच प्रिंटिंग मशीन
प्रयोगशाळा उपकरणे
हे मशीन कुठे विकत घ्यावे
केळी चिप्स व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्ही हे मशीन https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html वरून खरेदी करू शकता. हे मशीन ठेवण्यासाठी, तुम्हाला किमान 4000 5000 चौरस फूट जागा आवश्यक आहे. 28 हजार ते 50 हजारात हे मशीन मिळू शकते असा अंदाज आहे.
50 किलो चिप्स बनवण्यासाठी खर्च
50 किलो केळी चिप्स बनवण्यासाठी किमान 120 किलो कच्ची केळी लागेल. मित्रांनो सध्या बाजारातील भावाचा विचार करता 120 किलो कच्ची केळी सुमारे 1000 रुपयांना मिळतील. यासोबत 12 ते 15 लिटर तेल लागेल. 170 रुपये किलो प्रमाणे 15 लिटर तेलाची किंमत 2050 रुपये असेल. चिप्स फ्रायर मशीन 1 तासात 10 ते 11 लिटर डिझेल वापरते.
अर्थात 900 रुपयाचे डिझेल तुम्हाला लागेल. मीठ आणि मसाल्यांसाठी कमाल 150 रुपये खर्च येतो. तर 50 किलो चिप्स 3200 रुपयांना तयार होतील. म्हणजेच, एका चिप्सच्या पॅकेटची किंमत 70 रुपये पकडू ज्यामध्ये पॅकिंगच्या खर्चाचा समावेश आहे. जे तुम्ही ऑनलाइन किंवा किराणा दुकानात 90-100 रुपये प्रति किलो दराने सहज विकू शकता.
1 लाख रुपयांचा नफा कमावता येईल
जर आपण 1 किलोवर 10 रुपये नफा अशा पद्धतीने विचार केला तर तुम्ही एका दिवसात 4000 रुपये सहज कमवू शकता. म्हणजेच, जर तुमची कंपनी महिन्यातून 25 दिवस काम करत असेल तर तुम्ही एका महिन्यात 1 लाख रुपये कमवू शकता. निश्चितच व्यवसाय शेतकरी पुत्रांसाठी फायदेशीर ठरू शकतो.